⁠
InspirationalUncategorized

MPSC Success Story : सर्वसामान्य कुटुंबातील मुलीची PSI पदाला गवसणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या (पीएसआय) पदाच्या ५६० जागांसाठी २०२० साली परीक्षा घेण्यात आली होती. याची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील किणी येथील आफ्रिन मेहबूब बिजली हिचीही पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली.

आफ्रिनचे प्राथमिक शिक्षण किणी येथील जिल्हा परिषदेच्या कन्या विद्यामंदिर येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण किणी हायस्कूल येथे आणि उच्च माध्यमिक कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयात झाले. नंतर तिने पदवीचे शिक्षण सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात घेतले.

सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या आफ्रिन हिने अतिशय जिद्दीने अभ्यास करत राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. तिला तिचे चुलते – वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, वडील मेहबूब बिजली, आई शिरीन बिजली यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तिच्या निवडीनंतर किणी येथे तिची मिरवणूक काढून अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Back to top button