खाजगी कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून अक्षय झाला तहसिलदार!

Published On: ऑक्टोबर 11, 2023
Follow Us

MPSC Success Story कोणतेही स्वप्न नुसते बघून जात नाहीतर त्या स्वप्नाचा पाठलाग करावा लागतो. हेच प्रशासकीय अधिकारीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय ढाकणे याने चांगली कंपनीतील नोकरी सोडली आणि प्रशासकीय अधिकारी होण्याकडे लक्ष केंद्रित केले. यामुळे त्याने तहसिलदार हे पद मिळवले आहे.

अक्षयचे वडील अशोक ढाकणे एका छोट्या खाजगी कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतात. तर आई गृहिणी आहे. अक्षयच्या वडिलांनी वेळप्रसंगी मुलांच्या शिक्षणासाठी कंपनीतील कामाबरोबरच सकाळ शैक्षणिक पॅटर्नची पुस्तके विक्रीचीही कामे केली. घरच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे वडिलांचा आर्थिक भार हलका करण्यासाठी त्याने पदवीचे शिक्षण घेत असताना इतर कामही केले. पहिल्या पासून त्याला प्रशासकीय सेवेतील नोकरी खुणावत होती. चांगल्या पगाराची नोकरी सोडून अक्षयने पूर्णवेळ राज्य / केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरू केला.

अक्षयचे प्राथमिक शिक्षण भोसरी येथील महात्मा फुले विद्यालयात झाले. चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्तीला तो पात्र ठरला होता. तर माध्यमिक शिक्षण निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयातून पूर्ण केले. एनटीएस परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत त्याने स्थान पटकावले व शिष्यवृत्ती प्राप्त केली होती. इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत मागास विद्यार्थ्यामधून त्याने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला. अभियांत्रिकी शिक्षण सीओईपीमधून पूर्ण करताना इलेक्ट्रिकल या शाखेतून प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक प्राप्त केले.

एकंदरीत अक्षयचा शैक्षणिक प्रवासात हा प्रेरणादायी आणि उंचावत राहणारा आहे. अभियांत्रिकीची पदवी घेत असताना कॅम्पस मुलाखतीमध्ये त्याची एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीसाठी निवड झाली. पदवी मिळविल्यानंतर त्याने नोकरी जॉईन केली. परंतू, प्रशासकीय नोकरीचे स्वप्नासाठी तो धडपडत राहिला. त्याने दिवसरात्र मेहनत करून तहसिलदार हे पद मिळवून दाखवले. प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करताना गोरगरीब जनतेपर्यंत सरकारी योजना पोहोचवणे व त्याची अंमलबजावणी करणे व सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडेल अशी मदत करत राहणे, हा अक्षयच निश्चिय आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

वाह रे पठ्ठया! पहिल्याच प्रयत्नात पुण्याचा २२ वर्षीय तरुण झाला आयएएस

एप्रिल 23, 2025

यवतमाळच्या रिक्षाचालकाच्या लेकीने केली UPSC क्रॅक ; आता होणार जिल्हाधिकारी

एप्रिल 23, 2025
police

कोणतेही क्लासेस न लावता मारली MPSC परीक्षेत बाजी ; बनला पोलीस उपनिरीक्षक

एप्रिल 14, 2025

IAS होण्यासाठी तीन वेळा यूपीएससी क्रॅक केली ; चारू यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा..

एप्रिल 1, 2025

डॉक्टर झाल्यानंतर UPSC परीक्षा देण्याचा निर्णय ; तिसऱ्या प्रयत्नात मिळविले यश, वाचा IFS अपाला मिश्रांचा प्रेरणादायी प्रवास

मार्च 19, 2025

राहण्यासाठी घर नाही, दोन वेळच्या जेवणाचेही पैसे नव्हते ; पठ्ठ्याने जिद्दीने UPSC क्रॅक केली अन् बनला IAS

मार्च 17, 2025