⁠
Inspirational

गावात मूलभूत सेवा नसतानाही वनमजूराचा मुलगा झाला उपजिल्हाधिकारी !

MPSC Success Story : गावात कोणत्याही सुविधा नसतानाही हुशारीच्या जोरावर परिस्थितीवर मात करत डॉ. अर्जुन पावरा यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. डॉ. अर्जुन पावरा हे मूळ सातपुड्याच्या कुशीतील धजापाणी गावचे आहेत. अत्यंत दूर्गम भाग आणि सगळ्या सुविधांचा अभाव असल्याने त्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागले. तशी घरची परिस्थिती बेताची होती.वडील वनमजूर असले तरी त्यांनी मुलांना शिकवलं. अर्जुन यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण शिरपूरला झालं. दहावीनंतर शिरपूर येथूनच विज्ञान शाखेतून बारावी केली. त्यानंतर मुंबईतील सायन येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातून बीएएमएसची पदवी मिळवली.

त्यांचे या वैद्यकीय क्षेत्रात मन रमत नव्हते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होऊन लोकांच्या समस्या सोडवाव्यात असा विचार मनात येऊ स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

२०२० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत यश मिळालं. त्यांनी अनुसूचीत जमाती प्रवर्गातून राज्यातून द्वितीय क्रमांक मिळवला. मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
पण उपजिल्हाधिकारी व्हायचे आहे हे मनाशी पक्के असल्याने त्यांनी अजून जोमाने पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली.

रोजचे काम, अभ्यास आणि मेहनत….समोर दिसणाऱ्या गावातील समस्या. त्यांच्या मनात गावातील प्रश्न, मूलभूत हक्क, तेथील लोकांच्या समस्या यांचा विचार सातत्याने येत होता. यासाठी मेहनत करूया लोकांसाठी एक दिवस नक्कीच उपजिल्हाधिकारी होऊ, या विचाराने

Related Articles

Back to top button