⁠  ⁠

आई – वडिलांनी शेती व गुरे सांभाळत घडवलं ; शेतकरी पुत्र झाला पीएसआय अधिकारी !

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

अतिदुर्गम भागातील बालपण… संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून‌ अशा परिस्थितीत देखील एका होतकरू मुलाने सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले आणि ते पूर्ण झाले. तो शेतकरी पुत्र म्हणजे अरूण दशरश नागरगोजे. मेळघाटातील धारणी तालुक्यातील अतिदुर्गम भागात अरूणची जडणघडण झाली. त्याचे आईवडील दोघेही शेतीकाम करतात. त्यामुळे संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहे. अरूण देखील गावी आल्यावर त्यांना मदत करतं असे. त्याला चार भावंडं असून सारेजण उच्च शिक्षणाच्या वाटेवर आहेत.

मोठा भाऊ शेषराव नागरगोजे एस.आर.पी.एफ. मध्ये कार्यरत आहे. मोठा भाऊ शेषराव दशरथ नागरगोजे यांच्याकडून कायमच अरूणला आर्थिकदृष्ट्या मदत मिळाली. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आधार मिळाला. अरूणचे पदवी शिक्षण झाल्यावर त्याने सरकारी अधिकारी होण्याचे ठरवले. पण त्याच दरम्यान कोरोना लागला…आता पुढे काय?‌ हा प्रश्न उभा राहिला. पण कुटुंबाने अभ्यासासाठी प्रोत्साहन दिले.

या आधी त्याने एक वेळा राज्यसेवाच्या चार मुख्य परीक्षा, दोन वेळा पीएसआय मुलाखत, तीन वेळा एसटीआय मुख्य परीक्षा दिल्या आहेत. यात अनेकदा अपयश झाले. पण प्रत्येकवेळी अरूणने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. त्यासोबतच मैदानी सरावावर देखील लक्ष दिले. म्हणूनच त्याची पीएसआय पदी निवड झाली. गोलाईमधून पहिला पीएसआय अधिकारी अरूण ठरल्याने अनेकांसाठी प्रेरणा आहे.

Share This Article