बामणे जोडीची कमाल; दोघेही बनले प्रशासकीय अधिकारी!
MPSC Success Story : घरची परिस्थिती बेताची असली तरी घरच्यांनी शिक्षणासाठी आधार दिला. आपली नोकरी आणि सांसारिक जबाबदारी सांभाळून त्या दोघांनी हे यश मिळवले आहे. त्यामुळे नोकरी, बाळ सांभाळून एमपीएससीत (MPSC) अधिकारी होता येता हा नवा आदर्श सगळ्यांपुढे तयार झाला आहे. बघूया, आव्दिता बामणे आणि नागेश बामणे यांचा प्रेरणादायी प्रवास….
बसर्गीचे सुपुत्र श्री.नागेश बामणे यांची कक्ष अधिकारी मंत्रालय राजपत्रित दर्जा या पदी तर त्यांची पत्नी सौ.आद्विता शिंदे-बामणे यांची पोलीस उपअधिक्षक या पदी निवड झाली आहे. या आधी नागेश बामणे हे बीएसएनएल मध्ये पुणे येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी आद्विता शिंदे या प्रशिक्षणार्थी सहाय्यक निबंधक म्हणून नाशिक येथे कार्यरत होत्या. आद्विता या लग्नाच्या आधीपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होत्या.
त्यांचा बॅकिंग क्षेत्रात अधिक कल होता. पण लवकर लग्न झाल्यावर हे स्वप्न पूर्ण होईल की नाही हा प्रश्न होताच. पण मंडळींनी याला खूप आधार दिला. या प्रवासात अडचण देखील खूप आल्या. लहान मुलांचा सांभाळ, कौंटुबिक अडचणी यावर उपाय शोधत अभ्यास चालू ठेवला. तर, नागेश यांनी दिवसाचे तास व वेळेचे नियोजन करत८-८-८ या नुसार केले होते. नोकरीचे काम चोख करून बाकी अभ्यास हा सातत्याने केल्यामुळे हे यश संपादन झाले आहे.