⁠
Inspirational

आदिवासी भागात राहून देखील गडचिरोलीचा तरूण बनला पशुधन विकास अधिकारी!

MPSC Success Story : आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करायची तयारी असेल तर स्वप्न हे साकार होतेच. आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एका तरुणाने देखील मेहनतीच्या जोरावर असेच एक स्वप्न साकार केले आहे. डॉ. चेतन अलोने यांस एमपीएससीच्या परीक्षेत पाचव्या रॅंकसह पशुधन विकास अधिकारी हे पद मिळाले आहे.

डॉ. चेतन अलोने याचे प्राथमिक शिक्षण कै. मद्दीवार प्राथमिक शाळेतून झाले. तर माध्यमिक शिक्षण राजे धर्मराव कृषी विद्यालय अहेरी येथे पूर्ण झाले. पुढे उच्च माध्यमिक शिक्षणासाठी चेतन अलोने यांनी चंद्रपूर गाठले. जनता विद्यालयातून त्यांनी अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नीट परीक्षेत चांगले गुण मिळवत नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे प्रवेश मिळविला. २०१८ मध्ये बी.एस्सी पदवी मिळवली आणि २०२० मध्ये त्यांनी एमएस्सी मास्टर पूर्ण केले. त्यानंतर त्याने त्यानंतर, त्याने सरकारी अधिकारी होण्याचा स्वप्न उराशी बाळगून‌ ध्येयाने प्रेरित होऊन एमपीएससी परीक्षेसाठी निर्धार केला. त्याचासरकारी नोकरी मिळविणे हाच उद्देश होता. त्यामुळे, त्यांनी खाजगी कंपनीत नोकरी करता-करता एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

शिक्षण सुरू असतानाच त्यांना प्रख्यात अशा “प्रीमियम चिक फीड” कंपनीकडून चांगल्या पॅकेजची ऑफर मिळाली आणि त्यांनी ते स्विकारली.
डॉ. चेतन अलोने सध्या पश्चिम बंगाल येथील “वेंटेरिनरी” क्षेत्रातील भारतातील प्रख्यात अशा “प्रीमियम चिक फीड” कंपनीत कार्यरत असून त्यांना गलेलठ्ठ पॅकेज सुद्धा आहे. मात्र, यात ते समाधानी नव्हते.

त्याने २०२१ मध्ये पहिला प्रयत्न देखील केला. या काळात लेखी परीक्षा आणि मुलाखत दिली होती. मात्र, त्यांची निवड होऊ शकली नाही. एमपीएससीची परीक्षा म्हटली की अनेकदा अपयश पदरी पडतं, तर काहींना यश मिळतं. मात्र, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणीही आपल्याला आपल्या ध्येयापासून रोखू शकत नाही.

पुन्हा त्यांनी २२ डिसेंबर २०२२ मध्ये परीक्षा दिली. ५ सप्टेंबर २०२३ रोजी मुलाखत झाली आणि त्याचा निकाल काल २० ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. त्यात त्याची प्रशासकीय अधिकारी पदावर पशुधन विकास अधिकारी पदी निवड झाली.गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागात शिक्षण घेऊन एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवणे, ही खरंच कौतुकास्पद कामगिरी आहे.

Related Articles

Back to top button