MPSC Success Story : कोणत्याही ठिकाणी जीवनाचा प्रवास सुरू झाला तरी आयुष्याला आकार देण्याचे काम आपल्या हातात असते.तसेच गौरव वसंत वांढेकरचा प्रवास लहानशा गावातून झाले असले तरी आई- वडील, मित्रांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी २०२१ मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (MPSC) त्यांची क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
गौरवने सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून इंजिनिअर झाला तरी खाजगी नोकरी न करता शासकीय अधिकारी होण्याची वाट धरली. यात बरेच यश – अपयश आले तरी तो खचून गेला नाही. कोणतीही परीक्षा लहान नसते त्यामुळे प्रत्येक पद महत्त्वाचे आहे. यासाठी अभ्यास हा महत्त्वाचा आहे. यासाठी गौरव अहोरात्र मेहनत करत राहिला.
गौरव हा अहमदनगर मधील निघोज येथील आहे. दहावीपर्यंत शिक्षण साईनाथ हायस्कूल अळकुटी येथे झाले इंजीनियरिंग शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्द तर अभियांत्रिकी शिक्षण सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे या ठिकाणी झाले. त्यांचे वडील वसंत वांढेकर हे बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध अभियंता, तर आई नंदा वांढेकर गृहिणी आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत राज्यात नववा क्रमांक आला आहे. त्यांची क्लास वन अधिकारी म्हणून नेमणूक होणार आहे. लोकसेवा आयोगाचा अभ्यास २०१८ पासून केला. त्यानंतर दोन वर्षे कोरोनात गेली. २०२० मध्ये राज्यसेवेने हुलकावणी दिली. २०२१ मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांची क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाली आहे.