आपल्या बिकट परिस्थिती देखील जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. पण पैठण तालुक्यातील वडजी गावातील शेतकऱ्याच्या मुलाने करून दाखवले आहे.मदन सुभाष गोजरे हा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातून चौथी रँक घेऊन पोलिस उपनिरीक्षक होण्याचा बहुमान मिळविला आहे.
मदनची परिस्थिती जेमतेम…शेतात काबाडकष्ट करून संपूर्ण कुटुंब चालते. त्याच्या आई – वडिलांची इच्छा होती की पोराने उच्च शिक्षण घ्यावे आणि ही परिस्थिती बदलावी. त्याचा लहान भाऊ आप्पासाहेबने पदवीपर्यंत शिकला.दुसऱ्या क्रमांकाचा मदन….मदनने चौथीपर्यंतचे शिक्षण वडजी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर पाचवी ते अभियांत्रिकी पदवीपर्यंतचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण केले.
धाकटा भाऊ प्रद्युम्न तर बहीण रोहिणी यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांना सरकारी सेवेत नोकरी मिळेपर्यंत न थांबण्याचा निश्चय केला.रोहिणी व प्रदुघ्न हे दोघे वैद्यकीय क्षेत्रात अंतिम वर्षात शिकत आहेत, त्यांचा डॉक्टर होण्याचा मानस आहे. पण मदनने अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले.पोलिस खात्याविषयी स्वतःसह कुटुंबीयांना देखील तो अधिकारी व्हावे, हे वाटतं होते.
मदनने ऑक्टोबर २०२२ मध्ये लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षकपदासाठी पूर्वपरीक्षा दिली. यात उत्तीर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली होती.१६ जुलै २०२४ रोजी मुलाखत पार पडली. मात्र, त्याने एवढ्यावर न थांबता ऑगस्ट २०२३ मध्ये तलाठीपदासाठीही परीक्षा दिली होती. त्याचा निकाल मार्च २०२४ मध्ये लागून मदन यातही उत्तीर्ण झाला.गावातील सर्वप्रथम अधिकारी होण्याचा मान त्याने मिळविला.