MPSC Success Story : आयुष्यात घडपड करण्याची इच्छा असेल तर यशाची पायरी लगेच गाठता येते. कल्पेश चौरे हा मूळ करंभेळ ह्या गावचा रहिवासी आहे. पण वडील नोकरी निमित्ताने धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे स्थायिक झाल्यावर त्याची पुढची जडणघडण तिकडेच झाली.
कल्पेशचे प्राथमिक शिक्षण हे जि.प शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण कर्मवीर आ. मा. पाटील या विद्यालयात पिंपळनेर येथे झाले आहे. उच्चमाध्यमिक शिक्षण के.टी .एच एम कॉलेज नाशिक येथे पूर्ण झाल्यावर बी.ई सिव्हिलचे शिक्षण सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथे झाले आहे. इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो या परीक्षांकडे वळला. खरंतर कल्पेश हा आताच्या तरूणाईसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. तरूणांनी शासकीय नोकऱ्या मिळविण्याच्या प्रयत्नात एकाच प्रकारच्या शिक्षणावर अवलंबून न राहता आधीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यास यश नक्कीच मिळते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करावी यासाठी त्याने निर्णय घेतला.
त्यानुसार अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि अभ्यासात सातत्य कायम ठेवून तयारी केली. त्यामुळे, त्याला पहिल्याच प्रयत्नात एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे. त्याची मूल्यनिर्धारण संचालनाच्या आस्थापनेत सहाय्यक नगर रचनाकार , महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा या पदाकरिता निवड झाली.