⁠  ⁠

वडील सैन्यात तर लेक बनली कर सहाय्यक अधिकारी!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story प्रत्येक आई – वडिलांची आपल्या पाल्याकडून काही ना काही स्वप्न साकार करण्याबाबतची इच्छा असते. तशीच माधुरीच्या वडिलांची देखील होती. माधुरीचे वडील हे गावात प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. इतकेच नाहीतर त्यांनी याआधी देश सेवेसाठी बरीच वर्षे काम केले. आपण देखील देशाची सेवा करावी आणि चांगली प्रशासकीय अधिकारी बनावी, हा विचारांचे संस्कार लहानपणापासून माधुरीवर झाले. तसंच तिने देखील करून दाखवले.

ढोरजळगावने येथील माधुरी घोरपडे हिची एमपीएससी मार्फत कर सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. ढोरजळगावातील पहिली महिला अधिकारी होण्याचा मान माधुरीने मिळवला आहे. ती मेजर संभाजी घोरपडे यांच्या त्या सुकन्या आहेत. मेजर घोरपडे यांनी देश सेवा करून आता गावात एक प्रगतशील शेतकरी म्हणून तसेच एक यशस्वी पालक म्हणून त्यांची ओळख आहे.

माधुरीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ढोरजळगाव येथे उच्च माध्यमिक शिक्षण जिजामाता कॉलेज,भेंडा व बीएससी न्यू आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव येथे झाले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तिने आधी अभ्यासक्रम समजावून घेतला. भरपूर सराव प्रश्नसंचाचा सराव केला. यामुळेच तिला पहिल्या प्रयत्नात कर सहाय्यक अधिकारी हे पद मिळाले आहे. आपल्या मुलांनी अधिकारी व्हावं, अशी वडिलांची इच्छा होती. ती मेहनतीने माधुरीने पूर्ण केली.

स्पर्धा परीक्षांचे नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी जॉईन करा
फेसबुक पेज : Mission MPSC | टेलिग्राम चॅनल : @MissionMPSC

Share This Article