---Advertisement---

हॉटेल वेटरचा मुलगा बनला पोलिस उपनिरीक्षक ! वाचा त्याच्या जिद्दीची कहाणी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : घरची परिस्थिती अत्यंत बेताची, पुरेसे पाणी नसल्याने शेतीला देखील हवे तेवढे पीक नाही….रोजगाराचे साधन नाही.‌‌ राधानगरी धरणामुळे कांळबवाडी येथील अनेक कुटुंबे प्रकल्पग्रस्त झाले. साधारण १९८९ मध्ये दानोळी येथे कुटुंबे दाखल झाली. पुनर्वसन होताना अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. यात यांचे देखील कुटुंब होते. मारूतीचे वडील हॉटेलमध्ये वेटर, आई शेतमजूर अशा परिस्थितीत देखील उच्च शिक्षण आणि सरकारी नोकरीची जिद्द मनाशी बाळगून स्वप्न पूर्ण केले. मारुती गणपती पोवार यांची पोलिस उपनिरीक्षकपदाला निवड झाली आहे.

मारूती हे दानोळी येथे कांबळवाडी प्रकल्पग्रस्त वसाहतीमधील रहिवासी.वडील गणपती पोवार कोल्हापूर येथे हॉटेलमध्ये वेटर म्हणून करायचे. तर आई नंदा पोवार रोज लोकांच्या शेतात मोलमजुरी करून असा संसारगाडा चालवायचे. पण लेकांना उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांची धडपड कायम होती. त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला आयटीआय व पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर सायकलने प्रवास करून एमआयडीसीत काम करून कुटुंबाला आधार देऊ लागला. लहान मुलगा म्हणून मारूती हा बीएस्सी भौतिकशास्त्र झाला.

---Advertisement---

पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पोलीस दलात दाखल होण्यासाठी तयारी सुरू केली. मारूती सुरुवातीला कोल्हापूर येथे अभ्यासाला गेला. पण कोरोनाच्या काळात त्याने घरीच अभ्यास केला. आई – वडिलांना मदत करत, त्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी अभ्यासात गती ठेवली. फक्त गती ठेवली नाहीतर मैदानी सराव देखील केला. याच प्रयत्नांना अखेर यश आले. मारूतीची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts