⁠
Inspirational

कोणताही महागडा क्लास न लावता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराची पोलिस उपनिरीक्षक पदी गगनभरारी!

MPSC Success Story : स्पर्धा परीक्षा म्हटले की महागडे क्लास लावले जातात. पण स्वयंअध्ययानावर देखील यश मिळते हे मयूरने करून दाखवले आहे. कोणत्याही गोष्टीत सातत्य राखणे महत्वाचे असते. तेच मयूरने देखील केले. त्यामुळेच, त्याला हे पद मिळाले आहे.

मयूर हा वाई तालुक्यातील ओझर्डे गावामधील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा. मयूरचे प्राथमिक शिक्षण त्याच्या ओझर्डे गावातील जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शिक्षण पतीत पावन विद्यामंदिरमध्ये झाले आहे, तसेच इयत्ता बारावीचे शिक्षण राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे झाले आहे, तर बीएससी एग्रीकल्चर ही पदवी कृषी महाविद्यालय, पुणे येथून पूर्ण केली आहे.

पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मयूरने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे ठरवले. आपण शेतकरी कुटूंब आणि ग्रामीण जीवन‌‌ यात महागडे क्लास कुठून लावणार? एमपीएससीचा अभ्यास करत असताना कोणत्याही महागडे क्लास अथवा अकॅडमी न लावता स्वयंअध्ययन करण्याचा निश्चय केला.

यामुळेच तो एक नाहीतर दोन परीक्षा पास झाला.२०१९ पासून एमपीएससीचा अभ्यास करत असताना पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक अशा दोन परीक्षा दिल्या होत्या. या दोन्ही परीक्षा तो दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे. त्यापैकी त्याने पोलिस उपनिरीक्षक पद निवडले आहे.

या सगळ्या प्रवासात त्यांच्या आई- वडिलांचा मयूरला मोठा पाठिंबा मिळाला. त्यांना विश्वास होता की, आपला मुलगा सरकारी नोकरी मिळवणार…हेच, मैदानी सराव असो की रोजचे वाचन गावात राहून देखील स्वप्न पूर्ण करता येतात. हे मयूर याने दाखवून दिले‌ आहे.

Related Articles

Back to top button