---Advertisement---

घरच्यांच्या पाठिंब्यामुळे मोनाली जेधे जिद्दीने बनली राज्यकर निरीक्षक !

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : लग्नानंतर देखील घरच्यांनी खंबीरपणे पाठिंबा दिला तर मुली गगनभरारी घेतात. हे तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील मोनाली राजेंद्र जेधे हिने करून दाखविले आहे. माहेर – सासरच्या दोन्हीकडच्या मंडळीचा आधार असल्याने ती एमपीएससीमध्ये यश मिळवू शकली. या परीक्षेत तिची राज्यकर निरीक्षक पदी (एस.टी.आय) म्हणून निवड झाली आहे. तिच्या या यशाची कहाणी अनेक तरूणींसाठी प्रेरणादायी आहे.

मोनाली जेधे ही सध्या तळेगाव ढमढेरे परिसरात राहत असली तरी तर तिची संपूर्ण जडणघडण ही ठाण्यात झाली आहे. मोनालीचे वडील राजेंद्र विठ्ठल जेधे हे गुप्तचर विभागामध्ये अधिकारी आहेत. आई सुरेखा जेधे या गृहिणी आहेत. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र विद्यालय ठाणे येथे झाले. तर ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयात बी.एससी केमिस्ट्री ही पदवी पूर्ण शिक्षण पूर्ण केले.

---Advertisement---

तिचे पदवीचे शिक्षण झाल्यावर लग्न देखील झाले. म्हणजेच, साधारण चार वर्षांपूर्वी तळेगाव ढमढेरे येथील शेतकरी कुटुंबातील नारायण विलास ढमढेरे यांच्याबरोबर मोनालीचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर मोनालीच्या सासरच्या मंडळींनी खूप पाठिंबा दिला. सासू विजया विलास ढमढेरे व सासरे विलास सुदाम ढमढेरे यांनी आपल्या सुनेला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास प्रोत्साहन व प्रेरणा दिली. सासू – सासऱ्याने दिलेल्या प्रेरणेमुळे मोनालीने पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला पाठवले.स्पर्धा परीक्षेसाठी १०- १० तास अखंडित अभ्यास करायची. या जिद्दीने तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यकर निरीक्षकाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नांमध्ये मुख्य परीक्षेत यश मिळवून राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली. तिचे पुढे राजपत्रित अधिकारी होण्याचे स्वप्न आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts