MPSC Success Story आयुष्याच्या ठराविक टप्यावर आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. तसाच निर्णय निताने देखील घेतला. तिने पाथरी येथील निता घोरपडे यांनी पुण्यातील आयटी कंपनीतील नोकरी सोडून एमपीएसीमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. एकाच वर्षी त्यांनी ४ पदांना गवसणी घातली आहे. निता अनंत घोरपडे या पाथरी येथील रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यातील आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी एमएससी परिक्षेत यश मिळवलं आहे. त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही दिवस खाजगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.
यापूर्वी देखील त्यांनी एमपीएससीच्या पदांवर यश मिळवले आहे. सहाय्यक गटविकास अधिकारी पदाचे प्रशिक्षण पूर्ण लातूर जिल्हापरिषदेमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. त्याचबरोबर मंत्रालयीन सहा. कक्ष अधिकारी’ आणि ‘राज्य करनिरीक्षक’ या पदांच्या परिक्षा देखील त्या पास झालेल्या आहेत. एकाच वर्षी एकूण चार पदांवर यश मिळवल्याने त्यांचे कौतुक होत आहे.आताच्या एमपीएससीच्या २०२२ च्या परिक्षेत उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे.