⁠  ⁠

MPSC Success Story : सलून दुकान चालवणाऱ्याचा मुलगा बनला फॉरेस्ट ऑफिसर

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक तरुण-तरुणी उराशी बाळगून असतात. त्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत घेत असतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी MPSC परीक्षा देतात. यात काहींना यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा, मात्र स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि संयम ही त्रिसूत्री आवश्यक मानली जाते.

दरम्यान, एप्रिल महिन्यात MPSC मार्फत घेण्यात आलेल्या वन विभागाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात सलून दुकानात काम करणाऱ्याचा मुलगा फॉरेस्ट ऑफिसर बनला. मंगेश पवळ असे या तरुणाचे नाव असून त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या (एमपीएससी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. त्याची (वनपरिक्षेत्र अधिकारी) अर्थात रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदी नियुक्ती झाली आहे.

मंगेश पवळ हा बीड जिल्ह्यातील कडा या गावातील राहणार आहे. कड्यासारख्या ग्रामीण भागातील युवकाने अभ्यासाच्या बळावर यश मिळवले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचं कौतुक होत आहे.

अनेकदा अपयश आलं, मात्र..
मंगेश यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालय झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी थेट पुणे गाठले आणि पुणे येथे बी इ, इलेक्ट्रिकल टेलि कम्युनिकेशनची पदवी घेत 2016 रोजी एमपीएससीच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना अनेकदा अपयश देखील आले. मात्र यावर्षी पार पडलेल्या एमपीएससी परीक्षेत त्यांची वनपरिक्षेत्र अधिकारी या पदी नियुक्ती झाली आहे.

वडिल चालवतात कटिंग सलून
कडा येथील रहिवासी असणारा मंगेश यांचे वडील रमेश पवळ कटिंग सलूनच दुकान चालवतात. तर आई गृहिणी आहे. त्यामुळे घरची परिस्थिती आधीपासूनच जेमतेम होती. मागील वर्षीच मंगेश पवळ यांचा लहान भाऊ मयूर यांची एमपीएससी अंतर्गतच पीएसआय पदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर मंगेश देखील वनपरिक्षेत्र अधिकारी झाले असून आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.

Share This Article