---Advertisement---

सलून चालकाच्या मुलीची गगनभरारी ; MPSC परीक्षा पास होऊन बनली RTO इन्स्पेक्टर

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

Mpsc Success : अधिकारी बनण्याचे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न काहिंचेच हकीकतमध्ये उतरले जातात. मनात जिद्द आणि चिकाटी असेल तरच जीवनात कोणतेही यश तुम्ही मिळवू शकता. याचे उत्तम उदाहरण नागपुरात दिसून आले आहे. नुकताच राज्य लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात एका सलून चालकाच्या मुलीने गगनभरारी घेत एमपीएससीची परिक्षा पास होऊन आरटीओ इन्स्पेक्टर या पदाला गवसणी घातली आहे.

नागपूर मधील काटोल येथील रहिवासी असलेली सृष्टी दिवाकर नागपुरे हिने राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळविले आहे.  तिच्या वडिलांचा सलूनचा व्यवसाय आहे. तसेच घरची परिस्थिती बेताची आहे. या परिस्थितीतून हार न मानता सृष्टी दिवाकर नागपूरे या तरुणीने राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत बाजी मारली आहे. तिची आरटीओ इन्स्पेक्टरपदी निवड झाली आहे.

सृष्टी हिच्या वडिलांचे छोटेसे सलून आहे. त्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना मुलींना शिकवायचे आणि मोठे अधिकारी बनवविण्याचे स्वप्न आई- वडिलांनी पाहिले होते. त्यात त्यांच्या पहिल्या मुलीची मागच्या वर्षी पशुधन अधिकारी म्हणून निवड झाली. यानंतर धाकटीनेही अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि तिने यात स्वत:ला सिद्ध करुन दाखवले.

सृष्टीने वायसीसी कॉलेजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच खासगी कंपनीत नोकरी करताना जिद्दीने वेळात वेळ काढून अभ्यास करायचा आणि अधिकारी व्हायचे हे एकच ध्येय तिने ठरवले होते आणि ते तिने पूर्ण करुन दाखवले. यासाठी तिला मोठ्या बहिणीची प्रेरणा आणि आई-वडिलांचे पाठबळ मिळाले, असे आरटीओ इन्स्पेक्टरपदी निवड झालेली सृष्टी नागपुरे म्हणाली आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts