MPSC Success Story आपल्याला परिस्थितीसोबत सामना करता यायला हवा. यासाठी आई – वडिलांचा पाठिंबा नक्कीच महत्त्वाचा असतो.प्रथमेशचे वडील राजेंद्र कोतकर हे शहरात किरकोळ स्वरूपात भाजी विक्री करतात. तर आई त्यांना या कामात मदत करते. प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र आणि छाया कोतकर यांनी प्रथमेशला शिकविले. पण परिस्थिती व कष्टांची जाणीव ठेवून राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत प्रथमेश कोतकर यांनी जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पद मिळविले आहे.
प्रथमेशचे शालेय शिक्षण येथील न्यू सिटी हायस्कूलमध्ये झाले आहे.बारावी जयहिंद सीनिअर कॉलेज, तर छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई सिव्हिलची पदवी घेतली आहे. त्यांनी एमपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षेत ८७ वा रँक मिळविला. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याने खाजगी कंपनीत नोकरी देखील केली.मुंबईत लोढा ग्रुपमध्ये दोन वर्षे काम केले. ॲमेझॉनमध्ये दीड वर्षे काम केले. पण यात काही मन रमले नाही म्हणून त्यांनी एमपीएससी अभ्यास करण्याचे ठरवले.
इंजिनिअरिंगचे शिक्षण आणि या परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाची आखणी केली. यात त्याला यश देखील आले. यामुळेच, राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यात जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता या पदासाठी झालेल्या परिक्षेत शहरातील प्रथमेश कोतकर यांनी यश मिळविले आहे. प्रथमेश जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता (श्रेणी- २, राजपत्रित) पदी रुजू होतील.