---Advertisement---

पोलिस शिपायाची मुलगी झाली पीएसआय अधिकारी!

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story : आपले आई – वडील हे कायम आपले आदर्श असतात. प्रियांका बैसने देखील वडिलांच्या पाठोपाठ पोलीस खात्यात नोकरी मिळविल्याने प्रियंकाच्या आई वडिलाने देखील आनंद व्यक्त केला. पोलीस खात्यात नोकरी करत असलेल्या पोलिस शिपायाची मुलीने एमपीएससी परीक्षा पास करत पीएसआय होण्याचा मान मिळविला आहे. सध्या ती ट्रेनिंग घेत आहे.

प्रियांका बैस ही मूळची गोंदियातील रहिवासी. गोंदिया शहराच्या फुलचूर भागात राहते‌. तिने लहानपणापासूनच वर्दीची नोकरी मिळावी हे स्वप्न तिने पहिले असून त्याची तयारी देखील प्रियंकाने वयाच्या २१ व्या वर्षी सुरु केली. अवघ्या २३व्या वर्षी प्रियंकाने पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करत आपल्या आई – वडिलांचे नाव मोठे केले आहे.गोंदियातील प्रियंका बैस या तरुणीने पदवी पर्यंतचे शिक्षण गोंदियात घेत स्पर्धा परीक्षेकरता कुठलाही क्लास जॉईन न करता पुण्यातील एका वाचनालयात बसून तिने अभ्यास करत हे यश संपादन केले आहे.

प्रियंकाचे वडील रामसिंग बैस हे देखील गोंदिया पोलिस दलात कार्यरत आहेत. २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेत यश संपादन करत स्पोर्ट कोट्यातून विदर्भात पहिला तर राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर यश मिळवता येते हेच सिद्ध करून दाखविले आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts