---Advertisement---

अथक परिश्रमानंतर ऊसतोड मजुराचा मुलगा बनला पोलीस अधिकारी ; तरुणाचा संघर्षमय प्रवास एकदा वाचाच..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Mpsc Success Story : अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काहींना यश मिळतं. मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर डोंगराएवढ्या संकटाला भेदून यशाला गवसणी घालणं शक्य होते. याचेच एक ताजे उदाहरण बीडमध्ये पाहायला मिळाले. संकटाला भेदून हमालाच्या मुलाने पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली आहे. ज्ञानेश्वर देवकते असे या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर यांचा हा संघर्षयम प्रवास प्रत्येक तरुणाला ऊर्जा देणार ठरेल..

ज्ञानेश्वर देवकते हे बीड (beed) जवळच्या शिदोड येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची, आई वडील दोघेही मोलमजुरी करणारे.. शिकून मोठं व्हायचं स्वप्न या घरातील तरुणाने पाहिले. खाकी वर्दी अंगावर असावी असं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्ञानेश्वर यांनी मिळेल ते काम करून अभ्यास केला. हलाखीच्या परिस्थितीतही आपलं शिक्षण बंद पडू दिलं नाही आणि याच जिद्दीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर ते पोलीस उपनिरीक्षक झाला आहे.

कधी हमाली केली, कधी शेतात काम केलं
ऊसतोड मजुराच्या कुटुंबात जन्माला आलेल्या ज्ञानेश्वरने परिस्थितीवर मात करून पोलीस निरीक्षक होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. दहावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी पैसे नसल्याने त्याने कधी हमाली केली तरी शेतात काम केलं. ज्ञानेश्वर पोलीस व्हावा यासाठी त्याच्या आई-वडिलांनी देखील शेतामध्ये मोलमजुरी करून त्याला पैसे पुरवले.

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तो दिवसभर शेतात काम करायचा आणि रात्री अभ्यास करायचा पोलीस होण्याची त्याची पहिली संधी ही सहा गुण कमी पडले म्हणून हुकली होती तरीदेखील त्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न सुरु केले आणि नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने 248 गुण मिळवले आहेत. ज्ञानेश्वरचे आई वडील ऊसतोड मजूर आहेत मोलमजुरी आणि स्वतःच्या तीन एकर शेतीतून त्यांचा उदरनिर्वाह चालतो अशा परिस्थितीतही त्याच्या आई वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडू दिला नाही परिस्थितीमुळे ज्ञानेश्वर लाही वडिलांसोबत ऊस तोडावा लागला तर कधी शेतात मोलमजुरी करावी लागली

पाच वर्ष अथक परिश्रम
पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्ञानेश्वरने पाच वर्ष अथक परिश्रम घेतले. मोठ्या शहरात जाऊन अभ्यास करणं परिस्थितीमुळे शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी बीड मध्येच राहून आपला अभ्यास पूर्ण केला. त्याच्या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यात त्याचे कौतुक होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील अनेक मुलं-मुली स्पर्धा परीक्षेसाठी आपलं गाव, घर सोडून शहरामध्ये अभ्यासासाठी जात आहेत. पण काबाडकष्ट करून स्पर्धा परीक्षांसारख्या अवघड परीक्षेला सामोरे जाऊन त्यात यश मिळवणं, हे नक्कीच स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत उदाहरण आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts