MPSC Success Story : आपल्याला अभ्यास आणि अंतिम ध्येय पक्के असतील तर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते. त्यासाठी सातत्याने अभ्यास करायची गरज आहे. असेच, राजेश रावसाहेब अंधारे या युवकाने एमपीएससीच्या परीक्षेत दुहेरी यश मिळवले आहे. राजेश हे वैरागमधील छत्रपती शिवाजी नगर या भागातील रहिवासी. लहानपणीच त्यांचे आई – वडील वारले. त्यामुळे महत्त्वाचा आधार गेला. पण ते खचले नाहीतर हिंमतीने अभ्यास केला. त्यांचा संपूर्ण सांभाळ हा त्यांच्या आजी मधुमती मानल अंधारे यांनी केला. त्यांना शिकवले आणि उत्तम माणूस म्हणून घडवले देखील….
त्याचे शालेय शिक्षण हे तुळशीदास जाधव प्रशाला, वैराग येथे झाले. पहिल्यापासून त्याला अभ्यासाची आवड होती. त्यामुळे आपण उच्च शिक्षण घ्यावे ह्या उद्देशाने त्याने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले. त्यानंतर अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण देखील घेतले. या दरम्यान त्यांनी नोकरीच्या संधी लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला. त्यासाठीचा अभ्यासक्रम आणि मूल्यमापन चालू केले.
त्यांनी २०१४ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. यातही सेल्फ स्टडीवर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच त्यांची राज्य विक्रीकर अधिकारी पदी निवड झाली. मात्र त्या पदावर नियुक्ती होण्यापूर्वीच त्यांनी अजून एक यश गाठले. त्यांनी RFO परीक्षेत बाजी मारली. इतकेच नाहीतर एन.टी प्रवर्गातून ते महाराष्ट्रात तिसरे आले. या दुहेरी यशामुळे कुटूंबाला आणि संपूर्ण गावाला देखील अभिमानाने ऊर भरून आला.