MPSC Success Story : आपली परिस्थिती बदलणं हे आपल्याच हातात असतं याचं उदाहरण म्हणजे शीतल रमेश गायकवाड. तिची घरची परिस्थिती ही बेताची होती. साधं राहायला की नीट असं घर नाही… एकंदरीत घरची परिस्थिती बेताची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग सहायक संचालकपदी निवड झाली आणि आयुष्याला कलाटणी मिळाली.
शीतल ही राजनगर, मुकुंदवाडी परिसरात राहणारी रहिवासी.तिचे शालेय शिक्षण हे गावातच झाले.तिने डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर बीई, एमई असे उच्च शिक्षण घेतले. तिचे वडील व्यवसायाने टेलर आहेत. तिला अभ्यासाची आवड असल्याने एसटी महामंडळात नोकरी मिळविली.
या नाेकरीसाठी रोज अप-डाऊन आणि त्यासाठी एसटीचा प्रवास. याच प्रवासात एमपीएससी परीक्षेचा अभ्यास केला.रोज कन्नडला ये-जा करताना प्रवासातही त्या अभ्यास करीत असत. शिवाय मिळणाऱ्या प्रत्येक वेळेचा सदुपयोग अभ्यासासाठीच करीत असत. ‘एमपीएससी’ची ६ मे रोजी परीक्षा झाली. २२ ऑगस्ट रोजी मुलाखत झाली आणि ३१ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर झाला. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग सहायक संचालकपदी निवड झाली.अतिशय हलाखीची परिस्थिती असताना सर्व परिस्थितीवर मात करीत शीतलचे हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.