MPSC Success Story धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील अनेर नदीच्या काठी वसलेल्या तीन हजार लोकवस्तीच् वेळोदे गावात पारधी समाजाची शंभरच्या आसपास कुटुंब आहेत. तेथील बंशीलाल आत्माराम पारधी यांचा मुलगा शुभम पारधी. शुभमचे वडील हे ट्रकचालक आहेत. परंतू त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले. त्यांचा शुभम हा मोठा मुलगा तर त्याला दोन बहिणी आहेत. शुभमची एक बहीण शुभांगी हिचे डीएडचे शिक्षण पूर्ण झाले असून ती एका शाळेत शिक्षिका आहे. तर दुसरी बहीण श्रुती चोपडा येथे बीसीएचे शिक्षण घेत आहे.
शुभमचे शालेय शिक्षण हे गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर त्याने पदवीचे शिक्षण घेतले. पदवी उत्तीर्ण केल्यानंतर त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. जास्तीत जास्त घरीच त्याने ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अभ्यास करून २०२१ म़ध्ये पूर्व परीक्षा दिली. त्यानंतर मुख्य परीक्षा व मुलाखत….सर्व टप्प्यांवर तो उत्तीर्ण होत गेला.
या प्रवासात आर्थिक परिस्थिती बेताची असूनही त्याच्या आई – वडिलांनी कुठल्याही प्रकारची आर्थिक उणीव भासू दिली नाही. त्याने देखील परिस्थितीची जाणीव ठेवली आणि अभ्यास केला. सामान्य अशा कुटुंबातील शुभमने फौजदार पदाला गवसणी घातली.