⁠  ⁠

जिद्द असावी तर अशी!! बॅंकेतील नोकरी सोडून केला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अन् बनली अधिकारी..

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

MPSC Success Story : अथक परिश्रमाने स्वप्नांचा पाठलाग केल्यास एक दिवस यश नक्की हाती लागते. प्रामाणिकपणा, सातत्यता, कष्ट करण्याची तयारी व स्वतःला झोकून देत केलेले प्रयत्न आपल्याला ध्येय गाठण्यास पूरक असतात. हे सर्वसामान्य कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या सोनालीने दाखवून दिले आहे.

सोनाली म्हात्रे हिचा जन्म बीड जिल्हातील ईरला मजरा या छोटेखानी गावात झाला. घरात कोणत्याही सुखसोयी नसताना देखील तिच्या वडिलांनी मुलीच्या शिक्षणासाठी अपार कष्ट केले. मुलीने मोठे व्हावे आणि समाजात नाव कमावले या उद्देशाने कष्टाने सोनालीला कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग शिक्षण पूर्णसाठी आधार दिला.

तिने देखील इंजिनिअरिंग केल्यानंतर काही काळ बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये उपव्यवस्थापक म्हणून देखील काम केले. याच दरम्यान लग्न झाले तरी नोकरी व अभ्यास चालू ठेवला. पण नोकरी करतानाअभ्यासाला वेळ देता नाही म्हणून तिने करोना काळात जॉब सोडला. पूर्णतः स्पर्धा परीक्षांकडे वळली. २०२० मध्ये एमपीएससी परीक्षा देत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. तेव्हा दोनच पदे रिक्त असल्याने मला क्लास टू चे पद घ्यावे लागले.

तिचे ध्येय होते की आपल्याला क्लास वन बनायचे आहे…म्हणून, यंदाच्या निकालासाठी एमपीएससी परीक्षेसाठी ठरवून अभ्यास केला आणि ती राज्यात महिलांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. उपशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सोनाली म्हात्रे हिने २०२१च्या गुणवत्ता यादीनुसार दुसऱ्यांदा यशाला गवसणी घातली आहे.

Share This Article