⁠  ⁠

आश्रम शाळेत शिकलेली मुलगी बनली तहसीलदार; तिच्या जिद्दीची कहाणी एकदा वाचाच..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि कलागुणांना वाव दिला. तर ते नक्कीच उच्च शिखर गाठू शकतात. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी कोणत्याही बाबतीत अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी नाहीत याचा प्रत्यय अनेकवेळा वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवून दिले आहे. क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, उच्चपदस्थ अधिकारी होण्यापर्यंत सर्वच ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

असाच ठसा, सुजाता वायाळ या कन्येने दाखवून दिला आहे. सुजाता वायळ यांनी वडिलांच्या निधनानंतर प्रतिकूल परीस्थितीमध्ये सर्व कुटुंबाची जबाबदारी पेलत एमपीएससी परीक्षेत यश मिळवून नायब तहसीलदार पद मिळविले आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांनी राज्यसेवा परीक्षेमध्ये यश संपादन करत आदिवासी समाजाची मान उंचावली आहे. मुलांच्या बरोबरीने मुलींनीही एमपीएससी परीक्षेत यशाची शिखरे गाठत आश्रमशाळा विद्यार्थिनींपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा, केळीकोतुळ येथे शिक्षण घेतलेली विद्यार्थिनी सुजाता वायळ हिने राज्यसेवा परीक्षेत यश संपादन करत नायब तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे.

तिचे पहिली ते बारावी पर्यंतचे सर्व शिक्षण केळी कोतुळ आश्रमशाळेत झालेलं आहे. तिच्या सर्वांगीण जडणघडण आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये आश्रमशाळेचा व तेथील शिक्षकवृंद परिवाराचा विशेष सहभाग आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलगी प्रतिकूल शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये ध्येय निश्चित करून मेहनत घेतल्यास यशाचे शिखर गाठू शकते, तर आपल्या आश्रमशाळा कुटुंबातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये ती क्षमता आहे की तेही आपले ध्येय गाठू शकतात.

हे या कन्येने दाखवून दिले. तिची जडणघडण ही राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळा केळीकोतुळ येथे झाली. तिचे वडील आश्रमशाळेत कामाठी होते, त्यांच्या अकाली निधनानंतर आईने स्वयंपाकी म्हणून सेवा सुरु केली.

या दरम्यान तिने देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दररोज वाचन आणि नित्यनेमाने सराव केल्याने तिच्यातला आत्मविश्वास वाढत गेला. सुजाताला आश्रमशाळेत शिक्षण घेऊन पोलीस अधिकारी बनली. तेवढ्यावरच समाधानी न राहता सुजाताने नंतरच्या प्रयत्नात नायब तहसीलदार पद प्राप्त केले आहे. प्रतिकुल परिस्थितीत सुजाताने मिळवलेले यश हे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या आदिवासी मुलींसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

Share This Article