⁠
Inspirational

लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं, मात्र आईनं घडवलं; सुनील गोर्डे बनला PSI !

MPSC Success Story : आपल्या लहानपणीच हक्काचा आधार गेला तर परिस्थिती काय होते? हे आपण विचार देखील करू शकत नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथील सुनील गोर्डे या तरूणाने अशीच परिस्थिती ओढावली. तो चार वर्षाचा असतांना झाले.

वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्याची आई अलकाबाई गोर्डे यांनी आपल्या माहेरी (आगलावे गेवराई ) येथे राहून आपल्या दोन्ही मुलांना मोलमजुरी करून शिक्षण दिले. सुनीलचे पहीली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेवराई बुद्रुक येथे झाले. तर आठवी ते दहावी पिंपळगाव पांढरी येथील शारदा महाविद्यालय येथे तर अकरावी ते बारावी आडुळ येथील कन्या महाविद्यालायत तर आडुळ येथेच पदवीपर्यंत शिक्षण झाले. आईसोबत काम करत शिक्षण घेत त्याने अभ्यास केला.त्याचे पदवीचे म्हणजे बीए शिक्षण झाल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.

त्याने लहानपणापासून पोलीस अधिकारी पाहून आपणही देशसेवा करावी हे स्वप्न पाहिलं होतं.अभ्यासातील सातत्याच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अभ्यास केला. अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रयत्न केला. आपल्या आईचं स्वप्न साकारलं आहे.

Related Articles

Back to top button