जिल्हा परिषदची विद्यार्थिनी ते प्रशासकीय अधिकारी ; श्वेता हिचा प्रेरणादायी प्रवास!
आपण कोणत्या परिस्थितीतून किंवा शाळेतून शिकतो. यापेक्षा आपण जीवन प्रवास जगताना काय करतो, हे महत्त्वाचे आहे.कोरपना तालुक्यातील पालगाव येथील श्वेता बाबाभीम उमरे ही गोष्ट .
पालगाव येथील श्वेता ही निवृत्त शिक्षक बाबाभीम उमरे यांची मुलगी आहे . तर तिची आई गृहिणी आहे . श्वेताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते चार वर्गापर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर तिने जवाहरलाल नेहरू विद्यालय, आवारपूर येथून पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथून घेतले.
तर श्वेता इलेक्ट्रिकल अभियंता पोटे अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून पास झाली. अभियांत्रिकी क्षेत्रात मन रमत नसल्याने तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली.
रोजचे नियोजन, कामातील सातत्य, त्यातील उत्साह यामुळे
श्वेताला हे यश मिळाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप क २०२२ ची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ओपन मधून २४ तर अनुसूचित जातीतुन दुसऱ्या क्रमांकानी उत्तीर्ण झाली. श्वेता परीक्षा पास झाल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.