---Advertisement---

घरचा संसार सांभाळत MPSC ची तयारी केली अन् मिळविले यश.. वाचा वंदनाच्या यशाची कहाणी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

MPSC Success Story वंदनाने अनेक वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होण्याचे स्वप्न बघितले होते. या यशात कुटुंबीयांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या पाठिंबाशिवाय हे शक्य नव्हते.

वंदना यांना सुरवातीपासून अभ्यासाची आवड होती. काहीतरी करून दाखवायचे, सर्वसामान्यांची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यानुसार त्यांनी घरचा संसार सांभाळत एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. लग्नानंतरही परीक्षेची तयारी सोडली नाही. नोकरी व घर कामातून वेळ काढून वंदना यांनी परीक्षेत यश मिळविले. तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालयाच्या सहायक संचालकपदाची परीक्षा उत्तीर्ण केली.

यापूर्वी एमपीएससीची परीक्षा दिली होती. मात्र, त्यात यश मिळाले नाही. खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले.
वंदना शिंदे- गायकवाड ही निफाड तालुक्यातील कन्या आहे. तिचे प्राथमिक शिक्षण ओझर येथील अभिनव बालविकास मंदिर झाले. तर माध्यमिक शिक्षण माधवराव बोरस्ते विद्यालयात झाले.

नाशिक येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका, तर अमरावती येथील शासकीय महाविद्यालयात २०१५ मध्ये पदवी प्राप्त केली. घरचा संसार सांभाळत एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. मग लग्न आणि संसार सांभाळत तारेवरची कसरत तिने अभ्यास केला आणि हे यश संपादन केले.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Related Posts