---Advertisement---

MPSC Update : स्पर्धा परीक्षापद्धती आणि अभ्यासक्रमात मोठे बदल !

By Rajat Bhole

Published On:

MPSC Changes
---Advertisement---

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्याचा निर्णय आयोगामार्फत घेण्यात आला आहे. अधिकृत संकेतस्थळाच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आयोगाने नवीन बदलांबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. यामुळे आता राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची असेल यात सामान्य अध्ययनाच्या सोबत वैकल्पिक विषयाचा ही आता मुख्य परीक्षेत समावेश असेल.

राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता ही सुधारित परीक्षा योजना राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 पासून लागू करण्यात येईल. राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असे MPSC ने स्पष्ट केले आहे.

या पत्रकानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजना व अभ्यासक्रमात 3 मोठे बदल करण्यात आले आहेत.

1. राज्यसेवेची मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची असेल आणि एकूण 9 पेपर असतील.
त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे गुणांचे विषय असतील. हे दोनही पेपर 25 टक्के गुणांसह अर्हताकारी स्वरूपाचे असतील.

तर मराठी किंवा इंग्रजी माध्यमातुन निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 2 हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 गुणांसाठी असतील. मुलाखतीसाठी 275गुण असतील. त्यामुळे एकूण गुण 2025 असतील. आणि या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी विचारात घेतली जाईल.

2. सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील.

3. तसेच एकूण 24 विषयांतून उमेदवारांना 1 वैकल्पिक विषय निवडता येईल. वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 1, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक 2 असे दोन पेपर असतील.

या बदलांमुळे MPSC ची परीक्षा UPSC च्या धर्ती वर घेण्यात येईल हे स्पष्ट होत आहे. या आधी राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील पेपर क्रमांक 2 CSAT अर्हताकारी करण्यात आला होता. मात्र पूर्व परीक्षेच्या या बदलाची अंमलबजावणी 21 ऑगस्ट 2022 रोजी होणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेपासून केली जाणार आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now