⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत ‘लिपिक’ पदांसाठी मोठी भरती जाहीर

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MSCE Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 23 मार्च 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 23

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मुख्य लिपिक 06
शैक्षणिक पात्रता
: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.मुख्य लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय/ निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक.
2) वरिष्ठ लिपिक 14
शैक्षणिक पात्रता :
वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान दोन वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक नि टंकलेखन पदाचा अनुभव, एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
3) निम्नश्रेणी लघुलेखक 03
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.टंकलेखन / संगणक टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. चे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.एम.एस.सी.आय.टी. परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ मार्च २०२४ रोजी १८ ते ४३ (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षेचे शुल्क –
खुल्या संवर्गातील उमेदवार (अराखीव) रु. ९५०/-
मागासवर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग उमेदवार रु. ८५०/-
उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 एप्रिल 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://www.mscepune.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article