⁠  ⁠

राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करत असाल तर हे देखील वाचायला हवं!

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

काही दिवसांत राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार आहे.यासाठी सगळेजण जय्यत तयारीला देखील लागले असतील.कोणी सराव करत असेल तर कोणी वाचन करत असेल तर कोणी प्रश्नपत्रिका चाळत असेल.प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न आणि तयारी करत आहे.पण परीक्षेला जाताना कोणती काळजी घ्यावी? नेमकी कशी तयारी करावी? याबाबत बरेचजण संभ्रमात पडलेले दिसतात.त्यामुळे आदल्या दिवशीच आवश्यक बाबींची तयारी करून ठेवावी.याकरिता हे नक्की जाणून घ्या.

शैक्षणिक साहित्य-
परीक्षा म्हटलं की पेन,पट्टी,पॅड इ.वस्तू आलाच.पण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बॉल पेन वापरणे आवश्यक आहे.किमान दोन बॉल पेन सोबत ठेवावेत.तसेच एक रिफिल देखील सोबत ठेवणे आवश्यक आहे.जर रायटिंग पॅड वापरणार असाल तर तो पारदर्शक असणे आवश्यक आहे.

आहार-
परीक्षेला जाताना जेवणासारखा पोटभर आहार करू नये.अति खाण्यामुळे झोप आणि आळस देण्याची शक्यता असते.त्यामुळे परीक्षेला जाताना व मधल्या ब्रेकमध्ये खाण्यासाठी पौष्टिक व हलका आहार घेणे गरजेचे आहे.तसेच भरपूर पाणी देखील सोबत ठेवा.कधी-कधी टेन्शन आणि तणावामुळे शरीरातील ऊर्जा निघून गेल्यासारखे वाटते तर कधी घसा कोरडा पडतो.त्यामुळे पाणी सोबत असणे देखील महत्त्वाचे आहे.

कपडे:-
परीक्षेला जाताना नवे कपडे घालून जाण्याची आवश्यकता नाही.ज्या कपड्यात कंफर्टेबल वाटेल.ते कपडे घालून जावे.कारण आपल्याला तिकडे खूप वेळ बसावे लागते.त्यामुळे तसा पेहराव असावा.

प्रश्नपत्रिकेला घाबरू नका; आत्मविश्वास ठेवा.

प्रश्नपत्रिका बघितल्यावर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.तसेच प्रश्नपत्रिका बघण्यात रेंगाळत बसू नका.जेवढी सोपी आणि योग्य वाटणारे प्रश्न-उत्तर सोडवा. त्यामुळे अवघड वाटणारे प्रश्न सगळ्यात शेवटी सोडवायचा प्रयत्न करावा.थोडासा गोंधळ असणारे ओळखीचे प्रश्न सोडवताना स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत करण्यात आलेल्या सर्वेमधून ही गोष्ट सामोरी आली आहे, की उमेदवाराला सर्वात पहिल्यांदा जे उत्तर बरोबर आहे असे वाटलेले असते तेच उत्तर बहुतेक वेळा बरोबर असते.

आयोगाच्या उत्तरपत्रिका या OMR sheetच्या असतात.त्यामुळे उत्तरपत्रिका नीट भरणे देखील आवश्यक आहे‌.उगीच खाडाखोड, फाटणे, चुरगळणे, घाण होणे असे काही केल्यास त्या तपासल्याच जात नाहीत.

आत्मविश्वास-
प्रश्नपत्रिका सोडवताना/परीक्षा केंद्रापर्यंत जाताना.स्वत:वर आत्मविश्वास ठेवा.कादाचित जास्त परीक्षेच्या तणावामुळे आत्मविश्वास जाण्याची शक्यता असते.पण आपण काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रश्न व्यवस्थित समजून घेऊनच उत्तरांचे पर्याय वाचावेत. तसेच किमान दोन वेळा प्रश्न वाचला जावा व तितक्याच दक्षतेने उत्तरांचे पर्याय वाचून मगच उत्तरावर खूण करावी.

मानसिकता- आपण प्रश्नपत्रिका सोडवताना व परीक्षेला जाताना.आपल्या मनाची पूर्ण असणे आवश्यक आहे.

मित्रांनो, परीक्षेच्या अभ्यासाबरोबरच ही देखील तयारी व्यवस्थित करा.यश नक्कीच मिळेल.

Share This Article