⁠  ⁠

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात २०८ जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

एकूण २०८ रिक्त पदे भरली जाणार आहे. एसटी महामंडळ यवतमाळ येथे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३३ असावे.मोटर मेकॅनिकसाठी ७५ पदे रिक्त आहे. शिटमेटल पदासाठी ३० जागा रिक्त आहेत. डिझेल मेकॅनिकसाठी ३४ जागा रिक्त आहेत. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिकसाठी ३० पदे रिक्त आहेत. वेल्डरसाठी २० जागा रिक्त आहेत. टर्नर आणि पेंटर जनरल या पदांसाठीही रिक्त जागा आहेत. ()

१०वी आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करताना ५९० रुपये अर्ज भरायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Share This Article