⁠  ⁠

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनमध्ये विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MUCBF Bharti 2023 महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 19

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ट्रेनी सिनियर ऑफिसर (ब्रांच ऑफिसर) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव

2) ट्रेनी क्लर्क 15
शैक्षणिक पात्रता :
i) 50% गुणांसह पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य
भाषेचे ज्ञान:
मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.
अनुभव:
नागरी सहकारी बँकेतील/पतसंस्थेतील अधिकारी पदाचा पाच वर्षाचा अनुभव, तसेच कर्ज व वसुली विभागामधील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य.

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2023 रोजी 22 ते 40 वर्षे.
परीक्षा फी : 944/- रुपये
निवड पद्धत : निवड झालेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

निवड कार्यपद्धती :
ऑफलाईन परीक्षा :
Trainee Sr. Officer (Branch Officer) पदांकरिता १०० गुणांची लेखी (लघु व दिर्घ स्वरुपाची) परीक्षा ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून घेण्यात येईल. परीक्षेचा नमुना संकेतस्थळावर (http://www.mucbf.in) प्रसिद्ध करण्यात येईल. तद्नंतर १०० पैकी प्राप्त गुणांचे ९० च्या गुणोत्तरामध्ये रुपांतर करण्यात येईल.
कागदपत्रके पडताळणी:
उमेद्वारास ऑफलाईन परीक्षेतील गुणांच्या उतरत्या क्रमवारीनुसार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रकांची प्राथमिक कागदपत्रके पडताळणीसाठी बोलविण्यात येईल. त्यावेळी उमेद्वाराने मूळ कागदपत्रके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रके पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेद्वारास बँक धोरणाप्रमाणे बँकेकडून मुलाखतीस बोलविण्यात येईल.
मुलाखत:
Trainee Sr. Officer (Branch Officer) पदांकरिता उत्तीर्ण होणाऱ्या उमेद्वारांना बँकेच्या धोरणानुसार भरावयाचे पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षेचे गुणानुक्रमे मौखिक मुलाखतीस बोलविण्यात येईल. मौखिक मुलाखतीकरिता १० गुण (शैक्षणिक पात्रतेकरिता ५ गुण व मौखिक मुलाखतीकरिता ५ गुण) राहतील. उमेद्वार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस (परीक्षेत उत्तीर्ण झालेला असला तरी) पात्र राहणार नाही.
उमेद्वाराची अंतिम निवड सूची:
उमेद्वाराचे ऑफलाईन परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण १०० गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल.

नोकरी ठिकाण: जालना, छ.संभाजीनगर & परभणी
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : www.mucbf.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online

Share This Article