⁠  ⁠

जिल्हा न्यायालय नाशिक मध्ये सफाईगार पदांची भरती ; वेतन १५ ते ४७ हजार

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी एक संधी आहे. जिल्हा न्यायालय नाशिक अंतर्गत सफाईगार पदाच्या एकूण 10 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण गोंदिया आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.

एकूण जागा : १०

पदाचे नाव : सफाईगार

शैक्षणिक पात्रता : शरीर प्रकृतीने सुद्दढ असावा

वयोमर्यादा :

या जाहिरातीच्या दिनाकांच्या दिवशी उमेदवार १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा, सर्वसाधारण प्रवर्गकरिता ३८ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा व मागासवर्गीय असल्यास ४३ वर्षापेक्षा जास्त नसावा.

परीक्षा फी : या भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारले नाहीय.

नोकरी ठिकाण – नाशिक

वेतनश्रेणी :
सातव्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर एस १ या सुधारित वेतन संरचनेत रुपये १५,००० ४७,६००/- व नियमानुसार देय भत्ते.

कामाचे स्वरूप:

निवड झालेल्या उमेदवारास जिल्हा न्यायिक विभागांतर्गत कोणत्याही न्यायालयात “सफाईगार” या पदावर नियुक्ती दिली जाईल. नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या इमारतीतील व निवासस्थानातील प्रसाधनगृहांची, इमारतींची व परिसरांची नियमित स्वच्छता व साफ सफाई करणे, निगा राखणे इत्यादी कर्तव्ये पार पाडावी लागतील. तसेच अशा उमेदवारांनी न्यायालयाच्या आवारातील जागेची, बागेची निगा राखणेकामी आवश्यक ती सर्व कामे करावी लागतील. त्याचप्रमाणे अधिकारी यांचे निर्देशानुसार सर्व आवश्यक ती कामे करणे. सफाईगार हे पद एकाकी असून, पदोन्नतीची संधी उपलब्ध नाही. याबाबतची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जून 2021

अधिकृत संकेतस्थळ : www.districts.ecourts.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

उमेदवारांकरिता सूचना:

१) जे उमेदवार यापूर्वीच शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या त्या विभाग कार्यालय प्रमुखाची लेखी परवानगी घेवूनच अर्ज करावा, अशी परवानगी मुलाखतीच्या वेळी सादर करावी. उमेदवारांनी आपले अर्ज आपआपल्या विभाग, कार्यालय/प्रमुखामार्फत पाठविण्याची आवश्यकता नाही.
२) उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात स्वतः किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा न्यायीक विभागाच्या अधिका-यांना भेटण्याचा किंवा इतर गैरमार्गाचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठरविष्यात येईल. या बाबतीत निवड समितीचा निर्णय अंतिम राहिल.

३) अर्जाचा नमुना व सोबतच्या प्रमाणपत्रांचे नमुने जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिकचे अधिकृत संकेतस्थळ https://districts.ecourts.gov.in/nashik यावर उपलब्ध आहेत. त्या नमुन्यातच अर्ज व सादर करावा.

४) उमेदवाराने अन्य कोणतेही प्रमाणपत्र अथवा प्रमाणपत्रांच्या प्रती अर्जास जोडू नयेत.

५) उमेदवाराने त्याचे/तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (फोटो) अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करावी की, स्वाक्षरीची सुरुवात छायाचित्रावर करून तिचा काही भाग छायाचित्राबाहेर येईल.

६) उमेदवाराने दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत. तसेच त्यांचे विरुद्ध कुठल्याही न्यायालयात कुठलाही फौजदारी खटला निकाली/चालू किंवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणित करावे असल्यास त्याचा तपशिल द्यावा.

७) सफाईगारांच्या भरती प्रक्रीयेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास योग्य ते निकष लावुन पुढील प्रक्रीयेकरिता उमेदवारांची लघुसूची तयार करण्याचे अधिकार सल्लागार समितीस राहतील व त्यांचा निर्णय अंतिम राहील व अशी तयार केलेली लघुसुची जिल्हा न्यायालय, नाशिक येथील सुचना फलक व
https://districts.ecourts.gov.in/nashik या संकेतस्थळावर प्रसिध्द करेल.

८) सफाईगार पदासाठी लघुसूचीत नमुद उमेदवारांची २० गुणांची चापल्य व साफ-सफाई कामाचे मुल्यमापन परीक्षा घेण्यात येईल.

९) सफाईगार पदासाठी चापल्य व साफ-सफाई कामाचे मुल्यमापन परिक्षेतील गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची २० गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल.

१०) उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता, परिक्षा व मुलाखतीय बोलविल्यास स्वखर्चाने हजर रहावे लागेल.

११) सेवाप्रवेश प्रक्रीयेच्या वेळापत्रकात काही कारणाने बदल झाल्यास किंवा अन्य महत्त्वाची सुचना असल्यास त्याची माहिती जिल्हा न्यायालयाच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. परंतु तो बदल वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही.

१२) वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परिक्षेचा दाखला आवश्यक राहिल.

Share This Article