⁠  ⁠

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयात मोठी भरती, पगार 50,000

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयामार्फत भरती निघाली असून यासाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेले पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर अर्ज करू शकतात. कामगार आणि रोजगार मंत्रालयात तरुण व्यावसायिकांची भरती सुरुवातीला दोन वर्षांसाठी असेल. ज्याला पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते. अधिसूचनेनुसार, यंग प्रोफेशनल्सच्या एकूण 112 जागा आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज www.ncs.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल.

शैक्षणिक पात्रता :
कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या यंग प्रोफेशनल रिक्रूटमेंट 2022 साठी, उमेदवारांकडे BA, BE, BTech, BEd पैकी कोणतीही एक पदवी आणि चार वर्षांचा अनुभव असावा. पदव्युत्तर पदवी एमबीए अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, ऑपरेशन रिसर्च, सांख्यिकी, सामाजिक कार्य, व्यवस्थापन, वित्त, वाणिज्य इ. तसेच दोन वर्षांचा अनुभवही आवश्यक आहे. बॅचलर असो वा पीजी, किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

वय श्रेणी
तरुण व्यावसायिक पदासाठी उमेदवारांचे वय किमान २४ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावे.

पगार :
यंग प्रोफेशनल पदावर भरती झाल्यानंतर, दरमहा 50,000 रुपये पगार मिळेल.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

र्ज करण्याची शेवटची तारीख : १२ एप्रिल २०२२

अधिकृत संकेतस्थळ : ncs.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Share This Article