अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने ‘केपलर स्पेस टेलिस्कोप’द्वारे आठ ग्रह असलेल्या नव्या सूर्यमालेचा शोध लावला आहे.
या सूर्यमालेत ‘केप्लर ९०’ नावाच्या ताऱ्याभोवती चारही बाजूने ग्रह फिरताना दिसत आहेत, असे नासाकडून सांगण्यात आलं आहे. नासाकडून गूगलच्या मदतीने ‘एलियन वर्ल्ड’चा शोध घेण्यात येत आहे. केप्लर स्पेस टेलिस्कोपद्वारे या नव्या सूर्यमालेचा शोध लावण्यात आला असून त्यात आठ ग्रह आहेत. याचा व्हिडिओ ‘नासा’ने ट्विट केला आहे. आपल्या सूर्यमालेत सूर्याभोवती ग्रह फिरतात. त्याचप्रमाणे नव्या सूर्यमालेतही एका ताऱ्याभोवती ग्रह फिरत आहेत. पृथ्वीसारखा एखादा ग्रह या सूर्यमालेत आहे की नाही हे अद्याप समजू स्पष्ट होऊ शकलं नाही. पण या नव्या सूर्यमालेत ‘केप्लर ९०’ नावाच्या ताऱ्याभोवती चारही बाजूने इतर ग्रह फिरताना दिसत आहेत, असे नासाने सांगितले. ही नवी सूर्यमाला पृथ्वीपासून २, ५४५ प्रकाशवर्षे दूर असल्याची माहितीही दिली.