⁠  ⁠

ICMR मुंबईत 10वी, 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी, इतका मिळेल पगार

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई इथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. MTS (मल्टी टास्किंग स्टाफ), प्रकल्प तंत्रज्ञ III या पदांसाठी भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2022 असणार आहे.

एकूण पदे : ०२

पदाचे नाव
१) MTS (Multi tasking Staff)

२) प्रकल्प तंत्रज्ञ III (Project Technician)

शैक्षणिक पात्रता :

MTS : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शालेय शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रकल्प तंत्रज्ञ III : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

MTS (Multi tasking Staff) – 15,800/- रुपये प्रतिमहिना

प्रकल्प तंत्रज्ञ III (Project Technician) – 17,000/- रुपये प्रतिमहिना

वयोमर्यादा :

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 25 वर्षांपेक्षा अधिक नसावं. तसंच SC/ST/OBC/PWD उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

ही कागदपत्रं आवश्यक :

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article