Uncategorized
पंकज अडवाणीला बिलियर्डसमधील सतरावे जगज्जेतेपद
भारताचा आघाडीचा खेळाडू पंकज अडवाणीने जागतिक बिलियर्डसमधील आपला झंझावात काय ठेवत कारकिर्दीतील सतरावे जगज्जेतेपद पटकावले. दोहा येथे पार पडलेल्या आयबीएसएफ जागतिक बिलियर्डस अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत त्याने इंग्लंडच्या माइक रसेलचा ६-२ असा फडशा पाडला. एखाद्या खेळात एवढी जगज्जेतेपदे पटकावणारा पंकज हा पहिलाच भारतीय ठरला आहे.
पंकजला दुहेरी जगज्जेतेपद पटकावण्याची सुरेख संधी आहे; कारण सोमवारपासून बिलियर्डसमधील दीर्घ फॉरमॅटच्या जगज्जेतेपदाला सुरुवात होते आहे. पंकजने जगज्जेते पदापर्यंतच्या प्रवासात आपल्या भारतीय सहका-यालाही नमवले. उपांत्य फेरीत त्याने रुपेश शहावर ५-२, अशी मात केली होती. तर रसेलने सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टवर ५-१ असा विजय मिळवला होता.