⁠  ⁠

12वी ते पदवीधरांसाठी सुवर्णसंधी.. येथील हायकोर्टात 159 जागांसाठी भरती, पगार 81000

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

12वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. पाटणा उच्च न्यायालयात विविध पदांच्या 159 जागांसाठी भरती निघाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार पाटणा उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मार्च आहे.

एकूण जागा : १५९

रिक्त जागा तपशील
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 159 पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत. ही पदे स्टेनोग्राफर आणि कॉम्प्युटर ऑपरेटर कम टायपिस्टची आहेत. स्टेनोग्राफर गट क ची 129 पदे आणि संगणक परिचालक सह टंकलेखक गट क ची 30 पदांसाठी भरती करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता :

पाटणा उच्च न्यायालयाच्या या पदांसाठीच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलताना, स्टेनोग्राफर पदांसाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवार संगणक ऑपरेटर पदांसाठी अर्ज करू शकतात.

वयाची अट
यासाठी 18 ते 37 वर्षे वयोमर्यादा आहे.

परीक्षा फी :

UR/EWS/EBC/BC : 1000 रुपये
SC/ST/OH : 500 रुपये

पगार
तुमची पाटणा उच्च न्यायालयाच्या या पदांसाठी निवड झाल्यास उमेदवारांना 25,500 ते 81,100 रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.

अर्ज कसा करायचा?
उमेदवारांना या पदांबद्दल तपशीलवार माहिती हवी असल्यास तुम्ही पाटणा उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. उमेदवारांची निवड लेखी चाचणी, इंग्रजी शॉर्टहँड-संगणक टायपिंग चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : patnahighcourt.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Share This Article