---Advertisement---

Police Bharati 2022 : राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती

By Tushar Bhambare

Published On:

police-bharati-2022
---Advertisement---

Police Bharati 2022 : राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच सात हजार पदांसाठी पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment 2022) राबवण्यात येणार असल्याचे वृत्त ABP माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीची प्रक्रिया थांबली होती. यामुळे अनेक विद्यार्थी पोलीस भरतीची वाट पाहत होते. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेला बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. आता त्यामुळे राज्य सरकाराने सुरू केलेल्या हालचालीमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सात हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही भरती दहा हजार पदांसाठी असल्याची माहिती मिळत आहे. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता आता भरती प्रक्रिया गृहखातं राबवणार असल्याचे कळते.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now