---Advertisement---

PSI Mains : शारीरिक चाचणी परीक्षेत बदल ; आयोगाचे नवीन परिपत्रक

By Chetan Patil

Updated On:

psi mains phygical exam change
---Advertisement---

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने पोलिस उपनिरिक्षक (मुख्य परीक्षा ) अर्थात ‘पीएसआय’ पदाच्या भरतीसंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, यापुढे पीएसआय पदाची मुलखात देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुणं मिळवणं आवश्यक आहे, अशी माहिती आयोगाने परिपत्रक काढत दिली आहे.

तसेच या पदासाठीच्या शारीरिक चाचणीत 60 गुण असतील तरच उमेदवाराला मुलाखत देता येणार आहे. म्हणजेच उमेदवाराच्या क्वालिफिकेशनसाठी फक्त मैदानी गुण गृहीत धरले जाणार आहेत. याआधी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते.

मात्र आता अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळण्यात आले आहेत. हे गुण आता फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. उमेदवाराने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा दिल्यानंतर त्याला मैदानी परीक्षेत जर 60 गुण मिळाले तर त्याला मुलाखत देता येणार आहे. हे नवे नियम 2020 मध्ये निघालेल्या जाहीराला लागू असणार आहेत.

याआधी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता ते शारीरिक चाचणीचे गुण अंतिम गुणवत्ता यादीतून वगळले आहेत. आता इथून पुढे ते फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, अशी माहिती आयोगाने दिली आहे.

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.