कठीण परिस्थितीत स्वतःचे ध्येय न विसरता यशाचे शिखर गाठणाऱ्या सुवर्णाचा प्रवास हा अनेक ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी आहे.सिंदखेड तालुक्यातील सुवर्णा बाळू पाटील हिने ओबीसी गटातून २१ वा क्रमांक मिळवून तिची महाराष्ट्र पोलिस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड करण्यात आली.
तिचे आई – वडील दोन्ही नेवाडे येथे शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. सुवर्णा ही त्यांची मोठी कन्या असून अजून दोन मुली आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्याने तिने घरच्या घरी अभ्यास केला. तिला अभ्यासाची आवड असल्याने तिने शिक्षणाची कास धरली. सुवर्णाचे शिक्षण मु.जे. महाविद्यालय जळगाव येथे झाले आहे. एम. एस्सी. गणित विषयातुन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.आई -वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असले तरी तिच्या मामाच्या सहकार्यामुळे ती एवढी भरारी घेऊ शकली.
कोविड-१९ च्या काळात लाॅकडाऊन लागल्याने सर्व मुलं मुली गावी निघूल गेले असल्याने त्यांनी लाॅकडाऊन कालावधीत मुख्य परीक्षेचा व ग्राऊंडसाठी शिवाजी महाराज स्टेडियम येथे ग्राऊंडवर सराव सुरू केला. या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यानंतर त्यांनी नाशिक येथे स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर कोच वैभव झरोवर यांचे ग्राऊंड जॉईन केले.
काहीच दिवसात त्यांनी ग्राऊंड क्लिअर करून, लेखी परीक्षा देऊन PSI पदी यश प्राप्त केले. इतकेच नाहीतर महाराष्ट्र राज्यातून ओबीसी संवर्गातुन २१व्या क्रमांकाने कु.सुवर्णा बाळू पाटील PSI पदी निवड झाली आहे. नेवाडे गावात पहिलीच मुलगी. पी. एस. आय.पदाकरता नियुक्ती झाल्याबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.