Table of Contents
Rajyaseva 2021 : Economics
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ या Series मध्ये आपण
– राज्यसेवा २०२१ : राज्यशास्त्र
हे लेख पाहिलेत आता अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास कसा करावा हे समजून घेऊयात.
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ साठी “अर्थशास्त्र Economics” हा ‘Key Subject’ असू शकतो जर त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास केला तर. साहजिकच काही विद्यार्थ्यांना हा विषय – Basics मुळे कठीण वाटतो. काहींना तो Facts & Numbers वर प्रश्न जास्त विचारतात म्हणून कठीण वाटतो, तर काहींना या विषयाच्या Concepts कळण्यास उशीर लागतो. या आणि अशा अनेक मुद्यांवर आपण यावेळेस चर्चा करूयात :
MPSC Rajyaseva Economics Syllabus
सर्वात आधी आयोगाने दिलेल्या अर्थशास्त्राचा Syllabus मधील points बघुयात
1) Economic & Social Development
2) Sustainable Development
3) Poverty
4) Inclusion Growth
5) Demographics
6) Social Sector Initiative
हा आहे आयोगाने आपल्याला दिलेला Authentic syllabus आहे. स्पर्धा परीक्षेत syllabus ला खूप महत्व असते. त्यामुळे याला Ignore करून पुढचा अभ्यास सुरु करणे चुकीचे ठरेल. हा Syllabus छोटा असला तरी तितकाच महत्वाचा आहे. फक्त यात Previous Year Que Paper Analysis केल्यावर अजून काही point आपण add करूयात.
Economics चे प्रश्न कसे येतात व सध्या काय trend आहे?
आम्ही गेल्या पूर्व परीक्षांचे प्रश्न बघितले योग्य ते analysis केले. त्यावरून या घटकात Points मांडेल आहेत ते लक्षात घ्या.
अर्थशास्त्र विषयावर आलेल्या गेल्या वर्षातील प्रश्नाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे –
I) अर्थशास्त्राचे सर्वच प्रश्न फक्त Fact & आकडेवारीवर आधारित नसतात. So no Extra रट्टा मार !
II) अर्थाशास्त्रेचे काही प्रश्न Concept वर असतात ह्या Concept सुरवातीला समजायला कठीण वाटल्या तरी एकदा डोक्यात गेल्या की कसाही प्रश्न आला तरी Marks पक्का.
III) ३०% Topics वर ६०% प्रश्न म्हणजे काय ते तुम्हाला analysis चा Charts बघितल्यावर कळेलच.

याप्रमाणे जर वरील गोष्टींवर लक्ष देऊन Eco चा अभ्यासक्रम सीमित केला व मग समोर असलेल्या Topics चा सर्व बाजूनी अभ्यास केला तर हा विषय कठीण वाटत असला तरी तुम्ही योग्य मार्कस् घेऊ शकता.
अर्थशास्त्र चे Highlighted Topics ज्यावर आयोग पुन्हा पुन्हा प्रश्न विचारते
I) पंचवार्षिक योजना : या Topic वर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत १ तरी प्रश्न असतोच. तसेच या एका Topic सोबतच तुम्हाला त्यावेळच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक घटकांची देखील माहिती मिळते.
II) दारिद्य्र आणि बेरोजगारी : हा सुद्धा आयोगाचा नजरेसमोरीलमुद्दा आहे. यावर प्रश्न आकडेवारीवर आधारित जास्त असू शकतात.
III) योजना : या Topic वर प्रश्न कसे आणि किती येतात – Example. त्या योजनांचा स्थापना दिन, कोठे स्थापना झाली, उद्देश काय या प्रकाराचे प्रश्न याप्रकारात येतात.
MPSC Rajyaseva Economics Booklist
I) महाराष्ट्र शालेय पाठ्यपुस्तक – ११वी १२वी
II) भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे

III) स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र – किरण जी. देसले – दीपस्तंभ प्रकाशन

Economics वर आधारित चालू घडामोडीत येणारे प्रश्न कसे Tackle करावेत?
चालू घडामोडीत येणारे बरेच प्रश्न असे असतात जे Eco ला relate करतात किंवा त्या प्रश्ना विषयीचे Topics आपल्या Eco च्या Book मध्ये दिलेले असतात. त्यामुळे चालू घडामोडीच्या मुद्द्यांसोबत या घटकांची सांगड घातल्यास, आपल्याला त्याचा परिपूर्ण अभ्यास करता येऊ शकतो. आत्ता आपण ते point बघू जे Economics संबधित चालू घडामोडीत येतात.
I) आंतरराष्ट्रीय संघटना : आपल्या देशातील प्रमुखांनी भेट दिलेल्या किंवा भारतात झालेल्या बैठका या गोष्टी आयोगाच्या Foucs मध्ये असतात.
II) निर्देशांक : आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर जाहीर केलेले निर्देशांक याबद्दल प्रश्न आलेले आहेत.
III) अहवाल : यावरील प्रश्न सुद्धा निर्देशांकाप्रमाणेच येण्याची शक्यता असते.
IV) योजना : याविषयी आपण मागील मुद्द्यात बघितले आहे.
V) इतर घटक : चालू घडामोडीचे असे अजूनकाही घटक जे Eco च्या approach ने विचारले जातात. त्यामुळे आपण Eco चा अभ्यास करताना चालू घडामोडी वाचताना Eco चे points लक्षात घेऊन अभ्यास करावा.
आज अजून एक विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या विषयाचे सखोल विश्लेषण व अभ्यास पद्धतीबद्दल लेखांची आपण चर्चा केली. आम्हाला आशा आहे या लेखाची तुम्हाला मदत होत असेल. आपल्या पुढील अभ्यासासाठी तुम्हाला Mission MPSC Team कडून शुभेच्छा. पुढील विषयाचा लेख HISTORY लवकरच टाकण्यात येईल. आमच्या सोबत जोडून राहावे व Team च्या प्रयत्नांना साथ द्यावी, हि इच्छा.
धन्यवाद..!
लेख आवडल्यास शेयर करायला विसरू नका. Mission MPSC ला फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर नक्की फॉलो करा.
Best Economics guidance
Nice information give more information
Give more information
Nice information