• Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us
Sunday, February 5, 2023
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational
No Result
View All Result
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result

Home / मिशन राज्यसेवा २०२२ : इतिहास

मिशन राज्यसेवा २०२२ : इतिहास

July 14, 2022
Kunal PatilbyKunal Patil
in History, Important, Rajyaseva
mpsc history 2
SendShare199Share
Join WhatsApp Group

Rajyaseva 2022 : History

या आधीच्या लेखांमध्ये आपण खालील काही विषयांविषयी जाणून घेतले : राज्यसेवा २०२२ : मास्टर प्लॅन

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी काही वर्षांपूर्वी इतिहास हा एक Scoring विषय मानला जायचा. पण आयोगाने विचारलेल्या गेल्या 4 वर्षांच्या प्रश्नांवर लक्ष दिले तर आता या विषयालाला अधिक गांभीर्यांने बघावे लागणार आहे. याचा अभ्यास, अधिक सखोल Analysis करुन एक Strategy आखून करु शकतो. इथे गरज आहे : Smart Study करायची व त्यासाठी तुम्हाला या लेखाचा नक्कीच फायदा होईल.

गेल्या तीन वर्षात पूर्व परीक्षेत प्राचीन इतिहासावर प्रश्न येत आहेत व आधुनिक वर प्रश्न कमी येत आहेत. या प्रकारच्या चर्चा तुम्ही एकल्या असतील. पण हे सर्व ऐकण्यापूर्वी आपण प्रश्नपत्रीकांचे Analysis करुन अगदी मुद्देसुद ठरवायला हव की कोणत्या वर्षी कोणत्या Topic वर किती व कसे प्रश्न आलेले आहेत.

MPSC Rajyaseva History Syllabus

आपल्या लेखाची सुरवात आपण आयोगाने Syllabus मध्ये दिलेल्या विषयाच्या मुद्यांवरून करूयात. 

1) भारताचा इतिहास (महाराष्ट्राचा विशेष संदर्भासह)
2) भारताची स्वातंत्र्य चळवळ

आयोगाने इतिहासाचा Syllabus इतका संक्षीप्त करुन सांगितला आहे. पण मागील वर्षामध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत. ज्यावरुन आपण पुढील घटकांचा विचार करु शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आयोगाने पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा कोठेच स्पष्ट उल्लेख केलेला नाही पण त्यावर प्रश्न विचारले गेले आहेत. त्यासाठी इतिहासाचे Analysis करणे अजून आवश्यक होऊन जाते.

गेल्या 4 वर्षात जे आपल्याला वाटत आहे की, प्राचिन व मध्ययुगीन इतिहासावर प्रश्न जास्त येत आहे. याचा आपण सोईस्कर अर्थ काढतो की आधुनिकचे प्रश्न कमी होत आहेत.

इतिहास या विषयावर सध्या कसे प्रश्न विचारले जात आहेत?

आता आपण Actual प्रश्नसंख्या बघु.

2019 : आधुनिक इतिहास – 7 Question
मध्ययुगीन इतिहास – 2 Question
प्राचिन इतिहास – 6 Question

2018 : आधुनिक इतिहास – 6 Question
मध्य इतिहास – 3 Question
प्राचीन इतिहास – 6 Question

2017 : आधुनिक इतिहास – 9 Question
मध्य इतिहास – 0 Question
प्राचीन इतिहास – 6 Question

यावरुन आपण बघतो की, सरासरी 15 प्रश्न तर इतिहास या विषयावर येत आहेतच 4 वर्षात यात घटकांनुसार फरक पडला आहे. त्यामुळे आता फक्त आधुनिक इतिहासावर भर देऊन चालणार नाही. पण इतर घटकांचा प्राचीन व मध्ययुगीन व त्यासोबतच आधुनिक इतिहासाचा अभ्यास करतांना अधिक मुद्देसुद करावा लागेल कारण आता आपल्याला 15 ते 18 प्रश्नांकरीता प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक इतिहास या विस्तृत विषयाचा अभ्यास करावयाचा आहे. 

हे देखील वाचा : राज्यसेवा २०२२ : राज्यशास्त्र

MPSC Rajyaseva History Book List

1) 5 वी, 8 वी, 11 वी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तके

k sagar history book

2) प्राचीन व मध्ययुगीन भारत- ज्ञानदीप/के.सागर

modern india by bipin chandra marathi
adhunik bhartacha itihas
आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर

3) आधुनिक भारत- बिपीन चंद्र / ग्रोवर

4) महाराष्ट्राचा समग्र इतिहास – व्ही बी पाटील / अनिल कठारे

5) महाराष्ट्रातील समाजसुधारक – डॉ अनिरुद्ध – के सागर 

maharashtratil samajsudharak muddenihaya paramarsh

इतिहासाचे काही महत्वपूर्ण घटक

A प्राचीन इतिहास

I) या घटकांचा अभ्यास करतांना सोबत नकशाचा वापर करता येतो. त्यामुळे परीक्षेत उत्तर देतांना मदत होते. 
II) प्राचीन इतिहासावरील सर्वच नाही पण काही प्रश्न राजा त्यांचे राज्य, त्यांचे प्रदेश, त्यांनी केलेले युद्ध याविषयी प्रश्न येतात.
III) प्राचीन काळातील प्रसिद्ध साहित्य, शिल्प आणि व्यक्तीमत्व याबद्दल सुद्धा प्रश्न आलेले आहेत. (सांस्कृतिक)

B मध्ययुगीयन इतिहास

I) मध्ययुगीन इतिहासाचे जे काही 3-4 प्रश्न येतात. ते विविध राजे त्यांचे साम्राज्य, महत्वाच्या घटना या विषयी येतात. दिल्ली सल्तनत, विजयनगर, मुघल साम्राज्य यावर जास्त लक्ष द्यावे.

C आधुनिक इतिहास

I) चळवळी वर आधारित प्रश्न हे प्रत्येक परीक्षेत आलेले दिसतात.
II) गेल्या काही वर्षांपासून प्रश्न पत्रिकांमध्ये महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर प्रश्न आलेले दिसतात.

गेल्या काही वर्षात प्राचीन व मध्ययुगीन इतिहासावर जास्त प्रश्न येत आहेत. म्हणून आपण आधुनिक इतिहासाला  Ignore करुन चालणार नाही कारण अजुनही 8 ते 10 प्रश्न आधुनिक इतिहासावर येत आहेत. 

हे देखील वाचा : राज्यसेवा २०२२ : अर्थशास्त्र

इतिहासाविषयी काही वेगळं

आधुनिक इतिहासाचा अभ्यास करतांना आपण जर 10 वर्ष चे Slot करत गेलो व तसा अभ्यास केला तर हा विषय सोपा होत जाईल. 10 वर्षच्या Slot करुन त्या 10 वर्षात घडलेल्या एकूण घटना Count केल्या तर अगदी शेवटच्या क्षणालासुद्धा आपण त्याचा वापर Revision साठी करु शकतो. 

प्राचीन इतिहासाचा विचार केल्यास सध्या बाजारात उपलब्ध पुस्तके अगदी लहान Size ची असल्याने ती लवकर संपवता येतील. या विषयाचा कोणतेही एक Reference आणि इयत्ता 6 वी व 11 वी ची महाराष्ट्र शासनाचे पुस्तक इतक्यावरच प्राचीन इतिहास संपवून नंतर फक्त त्याची Revision करावी.

मध्ययुगीन इतिहास विषयी फक्त सरासरी 3-4 प्रश्न येतात. पण कोणत्या Topic वर येतील याची निश्चिती नसते. म्हणून या विषयाचा अभ्यास मोजका असवा व त्यासाठी 11 वी च्या इतिहासाचा पुस्तकाची मदत घ्यावी.

आपण लेखात इतिहासाबद्दल सविस्तर चर्चा केली. या विषयावर दर वर्षी 15-16 प्रश्न येत आहेत व पुढेही येण्याची अपेक्षा आहे. वरील पद्धतीने अभ्यास सुरु केल्यास आम्हाला विश्वास आहे तुम्ही इतिहासासारखा मोठा विषय अगदी सोप्या पद्धतीने अभ्यासून राज्यसेवेच्या परीक्षेत यश संपादन कराल.

हा लेख कसा वाटला, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद…!

Join WhatsApp Group
SendShare199Share
Kunal Patil

Kunal Patil

Tags: historyMPSC HistoryRajyaseva History

Comments 14

  1. Rishikesh dilip jawarkar says:
    11 months ago

    Good information for mpsc preparation

    Reply
  2. Pratap Chavhan says:
    1 year ago

    Thank you

    Reply
  3. Ravi Awathare says:
    1 year ago

    Thank you sir

    Reply
  4. Rutuja Phutane says:
    2 years ago

    Thank you sir

    Reply
  5. prasad says:
    3 years ago

    thanku sir

    Reply
  6. Pratiksha sawant says:
    3 years ago

    Thanks sir

    Reply
  7. Abhijit Kalantre says:
    3 years ago

    It is very useful to the new aspirant.

    Reply
  8. Asavari says:
    3 years ago

    Sir, this guidance is too useful but plz write something on how to manage job and study of mpsc

    Reply
    • Rajat Bhole says:
      3 years ago

      Sure We Will.

      Reply
  9. Yashwant borde jalna maharashtra says:
    3 years ago

    Thank you…

    Reply
  10. Rahul d says:
    3 years ago

    Thank you sir..

    Reply
  11. Pratiksha manwatkar says:
    3 years ago

    Thank u

    Reply
  12. Priyanka rajput says:
    3 years ago

    Thanku sir

    Reply
    • Bhagyashri nikam says:
      3 years ago

      Thank you sir pan sir combined examchi statergy pan lavkrch sanga

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In