⁠  ⁠

राज्यसेवा २०२२ : राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास कसा करावा ?

Kunal Patil
By Kunal Patil 4 Min Read
4 Min Read

नमस्कार,
मागील लेखात आपण पूर्व परीक्षेच्या अभ्यास रणनीतीबद्दल राज्यसेवा २०२२ मास्टर प्लॅन चर्चा केली. या लेखात Polity या विषयाबद्दल आपली या पूर्व परीक्षेत काय Strategy असावी आणि Polity विषयाचा आपण कसा अभ्यास करावा याचा विचार करूयात. Polity चा राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. अभ्यास मोजका करा पण अगदी बारीक गोष्ट लक्षात ठेवून करा. Syllabus मधील हा एक महत्वपूर्ण विषय असून तुम्ही हमखास यात Score करू शकणार आहात.

Polity विषयात साधारणतः Syllabus मध्ये जास्त बदल होत नसतो. त्याच प्रमाणे सर्व परीक्षेमध्येही कमी अधिक प्रमाणात Syllabus सारखाच असतो.
Less Up-gradation or Dynamic Nature as compare to other subjects

MPSC Rajyaseva Polity Syllabus

आपल्याला माहीतच आहे की, आयोगाने Syllabus किती short मध्ये दिलेला आहे. पण आपण यावर पर्याय म्हणून box ही Concept घेतली आहे. आयोगाने आपल्याला polity चा syllabus दिला आहे.

त्यातील मुख्य Points 

संविधान  (Constitution)
प्रशासन ( Governance)
राजकीय व्यवस्था ( Political system) 
पंचायत राज
नागरी प्रशासन 
Public issues 

पूर्व परीक्षेत या topics वर प्रश्न आले आहेत पण हे topic सोडून सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे इतर topics शोधण्यासाठी आपण Question Paper Analysis करतो.

Polity वर प्रश्न कसे येतात आणि सध्याचा काय rend आहे?

स्वत: Analysis करणे महत्वाचे. पण परीक्षेचा उरललेला कालावधी बघता Analysis करून गेल्या ५ वर्षातील परीक्षात Polity या विषयावर आलेल्या प्रश्नांची वैशिष्ट्ये –

१) Polity या विषयावर नियमित १२-१५ दरम्यान प्रश्न आलेलेच आहेत. 
२) राज्यशास्त्रसाठी तुम्ही वाचणारे पुस्तक Page to Page read करण्याची गरज नाही.
३) Polity च्या Previous Year परीक्षांमध्ये बघितल्यास मोजके Topics But त्यावर आधारित सखोल व अगदी बारीक प्रश्न.

म्हणजे काय तर काही Specific topics वर पुन्हा -पुन्हा प्रश्न आलेले आहेत व पुढील २०२२ च्या पूर्वपरीक्षेतही यावर जास्त प्रश्न आयोग विचारू शकतो.

आयोगाचे Highlighted असलेले Polity चे topics

हे topics असे आहेत ज्याबद्दल आयोगाने गेल्या काही वर्षात पुन्हा-पुन्हा प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्यामुळे पुढील परीक्षात सुद्धा येण्याची शक्यता आहे. 
(ही list जरी लक्ष्मीकांत Book चा Reference घेतला असता तरी तुम्हाला हे Topics तुमच्या Books मध्ये सापडतील.)

rajyaseva polity study chart

MPSC Rajyaseva 2022 Book list for Polity

Book list देताना आम्ही तुम्हाला फक्त एक किंवा २ पुस्तके देऊन इतर पुस्तक वापरूच नये असे सांगणार नाही. कारण तुम्ही एक विशिष्ट्य पुस्तक Read केले कि तुम्ही Pre Crack करणार असे बिलकुल होत नाही. याची Guarantee कोणीही घेऊ शकत नाही. फक्त तुम्हाला हवे असलेले प्रश्न व टॉपिकस ते पुस्तक वाचल्यानंतर Clear होताय का? – हे महत्वपूर्ण आहे.

indian polity m
1. भारताची राज्यघटना आणि शासन – लक्ष्मीकांत
bhartiya rajyaghatna tukaran jadhav
2. तुकाराम जाधव सर यांचे भारतीय राज्यघटना भाग १ आणि भाग २
maharashtratil panchayatraj k sagar
3. पंचायतराज – के. सागर
bharatichi rajyaghatna sarav prashna deepsthabh sandip patil
4. भारताची राज्यघटना, शासन आणि कायदा – सराव प्रश्नसंच दीपस्तंभ – संदीप पाटील

Polity चे काही असे topics आहेत जे आपल्या लक्षात ठेवावे लागतात (पाठ करावे लागतात)

१) कलम 
२) घटनादुरुस्ती
३) राज्यांची स्थापना
४) राज्यांच्या लोकसभा – राज्यसभा यातील जागा
५) राज्यांच्या विधानसभा-विधान परिषदेच्या जागा
६) पक्ष आणि त्यांचे स्थापना वर्ष 

हे काही topics आहेत ज्यांची तुम्ही list करून पुन्हा-पुन्हा read करत राहिल्यास तुम्हाला या गोष्टींची फक्त पूर्व परीक्षेतच नव्हे तर तुम्हाला मुख्य परीक्षेत सुद्धा मदत होईल. तुम्ही इतक्यावरच न थांबता तुम्हाला जे Topics IMP वाटतात त्यांच्या तुम्ही अशाप्रकारे List करून वापरू शकतात. पण फक्त अशाच गोष्टींवर Efforts घेण्याआधी विचार करा. यात किती परीक्षेत येऊ शकते ?

या लेखात आम्ही 1st Attempt देणारे आणि आधी पूर्व परीक्षा दिलेले सर्वांकरिता मार्गदर्शन केलेले आहे. या परीक्षेला स्पर्धा परीक्षा याकरिताच म्हणतात. कारण यात कोणतीही व्यक्ती तुम्हाला एका level पर्यंतच मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे आपले आपणच !

यामध्ये मांडलेला प्रत्येक Point पूर्व परीक्षेसाठी आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीची अभ्यास पद्धती वेगळी असू शकते, आग्रह इतकाच आहे की जास्तीत जास्त Point तुमच्या Schedule मध्ये Add करा व मेहनत घ्या. 

धन्यवाद!

Share This Article