सुमारे 164 वर्षे जुन्या अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टात मंगळवारी अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. या खटल्यावर अलहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर 7 वर्षांनी सुनावणी होत आहे. पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. बुधवारी वादग्रस्त इमारत पाडण्याच्या घटनेलाही 25 वर्षे पूर्ण होत आहेत. मंगळवारी दुपारी दोन वाजता सुनावणीला सुरुवात झाली. सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल आणि राजीव धवन आहेत तर रामलला पक्षाची बाजू हरीश साळवे मांडत आहेत.
दोन धर्मांच्या 3 न्यायाधीशांचे स्पेशल पीठ
चीफ जस्टीस दीपक मिश्रा: 3 तलाक बंद करणे आणि थिएटरमध्ये राष्ट्रगीतादरम्यान उभे राहणे गरजेचे असल्यासारखे निर्णय दिले आहेत.
जस्टीस अब्दुल नाजीर : तीन तलाकच्या पीठातही होता समावेश. परंपरेत हस्तक्षेत चुकीचे असल्याचे मांडले होते मत. प्रायव्हसी हा मूलभूत हक्क ठरवले होते.
जस्टीस अशोक भूषण: दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात सुरू असलेल्या अधिकारांच्या वादावर सुनावणी करत आहेत.
7 वर्षांपासून 20 याचिका प्रलंबित
या प्रकरणात 7 वर्षांपासून 20 याचिका प्रलंबित आहेत. यावर्षी 11 ऑगस्टला सर्वात आधी याचिका सुनावणीसाठी समोर आली होती. पण पहिल्यात दिवशी डॉक्युमेंट्सच्या ट्रांसलेशन (भाषांतर) च्या मुद्द्यावर प्रकरण अडकले. संस्कृत, पाली, फारशी, उर्दू आणि अरबीसह 7 भाषांमध्ये 9 हजार पानांचे इंग्रजीत भाषांतर करण्यासाठी कोर्टाने 12 आठवड्यांचा कालावधी दिला होता. त्याशिवाय 90 हजार पानांमध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. यूपी सरकारनेच 15 हजार पानांचे दस्तऐवज जमा केले आहेत. भाषांतर झाले की नाही हे कोर्ट तपासणार आहे, पण त्यासाठी सुनावणी टळणार नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. आजपासून दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकण्यास सुरुवात होणार आहे.