⁠  ⁠

आरबीआयकडून दरबदल नाही

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 1 Min Read
1 Min Read

आरबीआयचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी पतधोरण समितीच्या वतीने वार्षिक पतधोरणाचा द्वैमासिक आढावा बुधवारी जाहीर केला. महागाई दरात वाढ होण्याची शक्यता गृहित धरून रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बुधवारी रेपो व रिव्हर्स रेपो या दरांमध्ये कोणताही बदल केला नाही. आरबीआयने रेपो दर सहा टक्के तर रिव्हर्स रेपो दर ५.७५ टक्के कायम ठेवला आहे. यापुढील पतधोरण आढावा ६ व ७ फेब्रुवारी २०१८ रोजी घेतला जाणार आहे. यापूर्वी आरबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी महागाईदर ४.२ ते ४.६ टक्के यादरम्यान राहील, असे भाकित केले होते. आरबीआयने २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षासाठी विकासदर ६.७ टक्के राहील, असे सांगितले आहे.

rbi_monetary_policy_reviewrbi_monetary_policy_review

Share This Article