⁠
Uncategorized

रोहितचा विश्वविक्रम: 35 चेंडूंत ठोकले शतक

टीम इंडियाचा समामीचा फलंदाज रोहित शर्मा याने इंदूर येथे श्रीलंकेविरुद्ध शानदार फलंदाजी केली. त्याने टी-20 मध्ये अवघ्या 35 चेंडूत जलदगतीने शतक ठोकले.

सोबतच त्याने दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू डेव्हिड मिलरच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली.मिलरनेही 35 चेंडूत शतक ठोकले होते. त्यानंतर दक्षिण आफिक्रेचा क्रिकेटपटू रिचर्ड लेवी याचा क्रमांक लागतो. लेवी याने 45 चेंडूत शतक पूर्ण केले होते. दरम्यान, टीम इंडियातील एखाद्या क्रिकेटपटूने टी-20 मध्ये पहिल्यांदा जलद शतक ठोकले आहे. रोहित याने डेव्हिड मिलर याच्या विक्रमशी बरोबरी केली आहे. डेव्हिड मिलरने 29 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध 35 चेंडूत शानदार शतक ठोकले होते.

Related Articles

Back to top button