विज्ञान क्षेत्रात २०१४ साली घडलेल्या ठळक घटना
अनेकदा विज्ञानातील संशोधनात जे प्रयोग चालू असतात त्या सगळ्यांचीच दखल घेतली जाते असे नाही. लोकप्रियतेच्या आधारावर जास्तीत जास्त घटना या खगोलशास्त्रातील दिल्या जातात. काही घटना प्रायोगिक पातळीवर असल्या तरी त्या भविष्याची ज्योत असते. प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीचे ते एक पुढचे पाऊल असते जे कालांतराने आपल्याला कळते, पण त्यासाठी अनेक वैज्ञानिकांनी अहोरात्र संशोधन करून वर्षांनुवष्रे प्रयोग केलेले असतात. यंदा आपल्याला इबोला विषाणूने आपली जागा दाखवून दिली. वैद्यकीय क्षेत्रात रोगाची साथ आल्यावर लस शोधायची नसते तर ती आधीच शोधायची असते याची जाणीव निसर्गाने करून दिली. या रोगाने पश्चिम आफ्रिकेत ७ हजाराहून जास्त बळी घेतले. भारताच्या मंगळयानाने अवकाश विज्ञानात मोठी कामगिरी केली. अमेरिकेच्या मावेन या अवकाशयानाने मंगळावर जाऊन संशोधन सुरू केले. स्पेस शटलची जागा घेणाऱ्या ओरायन या नवीन अवकाश वाहनांची चाचणी यशस्वी झाली. युरोपीय समुदायाचे रोसेटा यान धूमकेतूवर उतरले व धूमकेतूवर स्वारी यशस्वी झाली. व्यावसायिक अवकाशयानाचे उड्डाण अपयशी ठरल्याने काही खासगी उद्योजकांचे मंगळ मोहिमेचे स्वप्न धोक्यात आले. पेरूयेथे हवामानविषयक जो करार झाला तो तकलादू आहे, त्यामुळे कार्बन उत्सर्जन वगरे काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. चीनचा तिरहाने २ हा महासंगणक पुन्हा पहिल्या क्रमांकावर आरूढ झाला. विज्ञान क्षेत्रात गेल्या वर्षभरात ज्या ठळक घटना घडल्या त्यांचा लेखाजोखा..
जानेवारी
नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार पृथ्वीचे तापमान इ.स. २१०० पर्यंत ४ अंश सेल्सियस तर इ.स. २२०० पर्यंत ८ अंश सेल्सियस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मायोटोनिक डिस्ट्रॉफी या आजारास एका रेणूतील दोष कारणीभूत असतो हे स्पष्ट झाल्यानंतर त्यावर संभाव्य औषध शोधून काढण्यात आले. २०१४ एए हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला. रक्तातील कर्करोग पेशींचे मेटास्टेसिस रोखण्याची नवी पद्धत कॉन्रेल विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधली. नासाने आबेल २७४४ या दीíघकासमूहाचे छायाचित्र टिपले. अंटाíक्टकावर मोठी घळई ग्रँड कॅनन सापडली. जनुकीय उपचार पद्धतीने सहा रुग्णांना अंधत्वापासून वाचवण्यात आले. चीनची युटू रोव्हर गाडी चंद्रावर गेली व तेथील मातीचे परीक्षण केले.
फेब्रुवारी
एका रेणूचा एलईडी तयार करण्यात यश आले. १० लाख वर्षांपूर्वीच्या होमो अँटेसेसर या मानवाच्या पाऊलखुणा इंग्लंडमधील हॅपीसबर्ग येथे सापडल्या. लंडनच्या किंग्ज कॉलेजच्या वैज्ञानिकांनी बुद्धिमत्तेशी संबंधित जनुक शोधून काढले. ४०० समिलगी व्यक्तींच्या अभ्यासातून लंगिक आकर्षण स्त्री-स्त्री, पुरुष-पुरुष असावे की कसे हे जनुकावर अवलंबून असल्याचे दिसून आले. जनुकीय परिवर्तन करून रोग न होणारे बटाटे तयार करण्यात ब्रिटिश वैज्ञानिकांना यश आले. सल्फेटमुळे पृथ्वीचे तापमान वाढत असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले. तीन हजार रुग्णांवर ११ युरोपीय देशात हृदयविकारावर मूलपेशींचा प्रयोग सुरू करण्यात आला.
मार्च
डीएक्स १० हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेला. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांना सागरी जलपातळी वाढण्याने धोका असल्याचे सांगण्यात आले. स्टॅनफर्डच्या जैवअभियंत्याने २००० पट मोठी प्रतिमा दाखवणारा कागदाचा सूक्ष्मदर्शक तयार केला. पातळ सौरघटाची क्षमता १७ टक्क्यांपर्यंत मिळवता आली. जैवविघटनशील बॅटरी वैज्ञानिकांनी तयार केली ती शरीरात वापरता येईल. यीस्टचे कृत्रिम गुणसूत्र तयार करण्यात यश आले. बाकदार तोंडाचा व्हेल मासा समुद्रात ३.२ किमी खोल सूर मारतो व तेथे १३७ मिनिटे राहतो. हा सस्तन प्राण्यांमधील विक्रम आहे, असे सांगण्यात आले. सीआरआयएसपीआर या जनुक संपादन तंत्राने रोग बरे करता येऊ शकतात त्याच्या मदतीने यकृताचा रोग बरा करण्यात यश आले.
एप्रिल
फळे व भाज्या जास्त प्रमाणात म्हणजे ५६० ग्रॅम सेवन केल्यास मृत्यूची शक्यता ४२ टक्क्यांनी कमी होते, असे युनिव्हर्सटिी कॉलेज लंडनच्या संशोधनात सांगण्यात आले. नासाने दिलेल्या माहितीनुसार शनीच्या एनसेलॅड्स या चंद्रावर सूक्ष्म स्वरूपात जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. तीस सेकंदात चाìजग होणारी बॅटरी तेल अवीव येथे एका प्रदर्शनात सादर करण्यात आली. सस्तन प्राण्यात गर्भधारणेसाठी जुनो नावाचे प्रथिन आवश्यक असते, असे नेचर या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या संशोधनात म्हटले आहे. आफ्रिकेतील स्लीिपग सीकनेसचे कारण असलेल्या त्सेत्से माशीचा जनुकीय आराखडा पूर्ण करण्यात आला. स्टॅनफर्डच्या अभियंत्यांनी आताच्या नऊ हजार पट वेगाने काम करणारी चिप तयार केली ती मानवी मेंदूवर आधारित आहे. प्रतिजैविकांना जीवाणू दाद देत नसल्याने प्रतिजैविकांचा म्हणजे अँटिबायोटिक्सचा अतिवापर धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.
मे
सध्या अमेरिकेत ई सिगारेटचे प्रमाण वाढले आहे पण त्यामुळेही कर्करोग होतो असे संशोधनात दिसून आले. १३ अब्ज वर्षांपूर्वीच्या विश्वाचे आभासी चित्र तयार करण्यात यश आले. आयसॉन धूमकेतूचे तुकडे झाले. अधिक प्रगत असलेला जैवयांत्रिक बाहू तयार करण्यात यश आले. कर्करोगग्रस्त मूलपेशींपर्यंत कर्करोगाचा माग काढण्यात आला. सर्वात मोठा डायनॉसॉर हा अर्जेटिनात सापडलेल्या जीवाश्मावरून ७७ टन वजनाचा होता व तो टिटॅनोसॉर प्रजातीचा होता. स्वादुिपडाच्या कर्करोगातील एका विशिष्ट जनुकाचे उत्परिवर्तन शोधण्यात आले.
जून
ट्रीडमीलवर ताशी ४६ किलोमीटर वेगाने पळणारा यंत्रमानव कोरियाने तयार केला. चंद्र आणि पृथ्वी आपण समजतो त्यापेक्षा ६ कोटी वष्रे जुने असल्याचे पुराव्यात दिसून आले. सामन माशाचा जनुकीय आराखडा पूर्ण झाला. सिलिकॉनची जागा घेऊ शकणाऱ्या कार्बन नॅनोटय़ूब्ज तयार करण्यात आल्या त्या इलेक्ट्रॉनिक सíकटमध्ये वापरता येतील. क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळावरील वर्ष पूर्ण केले.
जुलै
नासाने कार्बन डायॉक्साईडचा अभ्यास करण्यासाठी ऑरबायटिंग कार्बन ऑब्झर्वेटरी हे अवकाशयान सोडले. स्वमग्नता हा रोग जनुकीय उत्परिवर्तनामुळे होत असल्याचे स्पष्ट झाले. फुले जास्त काळ टवटवीत ठेवण्याचे तंत्रज्ञान जपानी वैज्ञानिकांनी शोधून काढले. व्हायेजर १ यानाला अवकाशात सूर्याकडून फेकल्या जाणाऱ्या सुनामी लाटांचा परिणाम जाणवला त्यामुळे हे यान आंतरतारकीय अवकाशात अजूनही असल्याचे स्पष्ट झाले. सेंद्रिय फळे व भाज्यांमध्ये नेहमीच्या भाज्या व फळांपेक्षा अँटिऑक्सिडंट ७० टक्के जास्त असल्याचे व विषारी धातू कमी असल्याचे दिसून आले. एड्सचा एचआयव्ही विषाणू मानवी पेशीतून नष्ट करता येतो हे पुराव्यानिशी दाखवण्यात आले. १८८० पासून मे व जून २०१४ हे सर्वात उष्ण महिने होते असे दिसून आले. केप्लर ४२१ बी या नवीन बाह्य ग्रहाचा शोध लागला. उंदरांच्या त्वचेतील न्यूरॉन्सचे रिप्रोग्रॅिमग करून ते जास्त स्थिर असल्याचे दिसले. त्यामुळे दोषयुक्त न्यूरॉन्सच्या जागी चांगले न्यूरॉन्स प्रस्थापित करून पाíकन्सनवर उपचार करता येण्याची शक्यता दिसून आली.
ऑगस्ट
हेपॅटिटिस सी हा २०३६ पर्यंत दुर्मीळ आजार ठरेल असे संगणकीय प्रारूपाच्या आधारे सांगण्यात आले. आयबीएम रीसर्चने मेंदूसारखी संगणक चिप तयार केली. त्यात १० लाख प्रोग्रॅमेबल न्यूरॉन्स व २५.६० कोटी सíकट्स म्हणजे सिनॅप्सेसचा वापर करण्यात आला. रशियन अवकाशवीरांना अंतराळस्थानकाबाहेर सागरातील प्लँक्टन वनस्पती सापडली ती तिथे कशी आली हे मात्र समजू शकले नाही. रानटी स्वरूपातील माणसाचा पूर्वज युरोपात आपण समजतो त्यापेक्षा १० पट जास्त म्हणजे पाच हजार वष्रे अस्तित्वात होता असे दिसून आले. थायमसची प्रथमच प्राण्यांच्या शरीरात ठरवून दिलेल्या पद्धतीने वाढ करण्यात आली. व्यायाम करणाऱ्या लोकात वाइनमुळे हृदयविकाराचे प्रमाण कमी होते असे दिसून आले.
सप्टेंबर
कार्यालयात छोटय़ा वनस्पती लावल्यास कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता १५ टक्के वाढते, असे क्वीन्सलँड विद्यापीठाच्या संशोधनात दिसून आले. वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याचा वेग मानवपूर्व काळापेक्षा १००० पटींनी अधिक असल्याचे दिसून आले. पाच हजार मलांवर असलेल्या लोकांमध्ये मेंदू-मेंदू संपर्क प्रस्थापित करण्यात यश आले. ब्राझीलमध्ये २०१३ मध्ये २९ टक्के वाढले म्हणजे ५८९१ वर्गकिलोमीटर जंगलतोड झाल्याचे दिसून आले. कॅनडात २००० ते २११३ दरम्यान ब्राझीलपेक्षा जास्त म्हणजे १०.४ कोटी हेक्टर क्षेत्रात जंगलतोड झाल्याचे दिसून आले. पृथ्वीवर ऑक्सिजन निर्मिती करणारे सजीव आपण समजतो त्याच्या ६० कोटी वष्रे आधीपासून अस्तित्वात होते. कॉफी या वनस्पतीची २५ हजार जनुके शोधण्यात आली. सॅनडिस्क कंपनीने ५१२ जीबीचे एसडी कार्ड तयार केले. अधिक वेगाने पाण्यापासून हायड्रोजन तयार करण्यात आला. १०० अब्ज प्राण्यांना जनुकसंस्कारित अन्न व साधे अन्न देण्यात आले. जनुकसंस्कारित अन्नामुळे त्यांच्या प्रकृतीवर काहीही परिणाम दिसला नाही. नराश्यासाठी रक्तचाचणी विकसित करण्यात आली. कर्करोगास कारण ठरणाऱ्या मेटॅस्टॅसिस या प्रक्रियेला रोखणारे प्रथिन स्टॅनफर्डच्या संशोधकांनी तयार केले. अमेरिकेचे मावेन यान मंगळावर पोहोचले. त्यानंतर भारताचे मंगळयानही तेथे पोहोचले. मायक्रोसॉफ्टने िवडोज १० ही प्रगत ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली. इबोलाचा रुग्ण अमेरिकेत सापडला.
ऑक्टोबर
गर्भाशय प्रत्यारोपित केलेल्या मातेने प्रथमच बाळाला जन्म दिला. एडवर्ड मोसेर, मे ब्रिट मोसेर व जॉन ओकिफ यांना मेंदूतील जीपीएस प्रणालीच्या संशोधनासाठी वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. भौतिकशास्त्राचे नोबेल इसामु अकासाकी, हिरोशी अमानो व
शुज नाकामुरा यांना एलईडी लाइटच्या संशोधनासाठी जाहीर झाले, तर रसायनशास्त्रात फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपीसाठी एरिक बेटझिग, विल्यम मोरनर व स्टेफन हेल यांना नोबेल मिळाले, त्यांनी नॅनो सूक्ष्मदर्शक तयार केला आहे. गर्भाच्या मूलपेशींचे रूपांतर इन्शुलिन निर्मिती करणाऱ्या पेशींमध्ये करण्यात हार्वर्डच्या वैज्ञानिकांना यश आले. कॉफीचे रोज सेवन केल्यास यकृतात घातक वितंचकांचे प्रमाण २५ टक्के कमी होते. नाकातील पेशी मेरुरज्जूत टाकल्याने पक्षाघात झालेला रुग्ण चालू लागला. २५ मिलिलिटर रक्तातील मूलपेशींपासून नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यात यश आले. डीएनएवर आधारित विद्युत मंडले तयार करण्यात आली. मूलपेशींपासून मानवी पोट आतडे तयार करण्यात आले त्यामुळे अल्सर व इतर आजारांवर उपचार कालांतराने शक्य होईल.
नोव्हेंबर
वैज्ञानिकांनी प्रतिजैविकांशिवाय उपचार करू शकतील असे नॅनोकण मेदापासून तयार केले. उंदरांमध्ये नवीन न्यूरॉन्स मूलपेशीपासून तयार करून त्यांचा पाíकन्सन बरा करण्यात यश आले. रोसेटायानावरील फिली प्रोब ६७ पी चुरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतूवर उतरले. जागतिक तापमानावाढीने इ.स. २१०० पर्यंत विजा पडण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढणार आहे असे बर्कलेच्या युनिव्हर्सिटि ऑफ कॅलिफोर्नियाने म्हटले आहे. छायाचित्रे ओळखणारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर गुगल व स्टॅनफर्ड विद्यापीठ यांनी तयार केले.
डिसेंबर
साडेतीन ते साडेचार कोटी वर्षांपूर्वीच्या मांसभक्षी वनस्पतीचे जीवाश्म सापडले ती रोरिडय़ुला प्रजातीची होती. आपल्या विश्वाचे वय १३.८ अब्ज वष्रे असून त्यात ४.९ टक्के अणुद्रव्य व २६.६ टक्के कृष्णद्रव्य, तर ६८.५ टक्के कृष्ण ऊर्जा असल्याचे इटलीतील एका खगोल परिषदेत सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक सíकटसाठी त्रिमिती प्रिंटिंगचा वापर करण्यात आला. जगात प्रथमच कृत्रिम वितंचके तयार करण्यात आली. सौरघटाची कार्यक्षमता ४६ टक्क्यांपर्यंत मिळवण्यात फ्रेंच-जर्मन कंपन्यांना यश. पाच हजार स्त्रियांचा दहा वष्रे अभ्यास केला असता भूमध्यसागरी भागातील आहाराने आयुर्मान वाढते यावर शिक्कामोर्तब झाले. इतर ग्रहांवर बुद्धिमान सजीव असल्याबाबतचे ड्रेक समीकरण केप्लर दुर्बिणीच्या माहितीआधारे बदलले असा ग्रह १०-१०० प्रकाशवष्रे दूर असून बुद्धिमान सजीव असलेला ग्रह काही हजार प्रकाशवष्रे दूर असल्याचे सांगण्यात आले. स्पेस शटलची जागा घेणाऱ्या ओरायन अवकाशवाहनांची चाचणी यशस्वी झाली. मंगळावर कार्बनी रेणू सापडला. भारताच्या जीएसएलव्ही मार्क २ प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी अवकाशकुपी अंतराळात. मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी भारताचे पहिले पाऊल यशस्वी. प्रयोगशाळेत कृत्रिम रसायन तयार करण्यात यश. केवळ चार रसायन वापरून नवीन रसायनांची निर्मिती. रासायनिक उत्क्रांतीची कल्पना यशस्वी झाली.
हा लेख राजेंद्र येवलेकर (rajendra.yeolekar@expressindia.com) यांनी लिहला असून दैनिक लोकसत्तावरून साभार घेण्यात आला आहे.