⁠  ⁠

संसारगाडा सांभाळत सविताने केले वर्दीचे स्वप्न पूर्ण!

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

प्रत्येकाच्या मनात वर्दीपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न असते. असेच स्वप्न सविताने लहानपणापासून उराशी बाळगले. तिला देखील इतरांप्रमाणे ‘वर्दी’चेच आकर्षण होते. परंतू, ग्रामीण भागातील बालपण, लवकर संसारगाडा यात स्वप्नांविषयी आशा राहते की काय हे कायम सतावत होती. पण जिद्दीच्या जोराने ती खुल्या गटातून राज्यात दुसऱ्या क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाली. राज्यातून हजारो विद्यार्थी होते. महिलांसाठी एकच जागा होती. पण अभ्यासाच्या सातत्यामुळे हे यश संपादन केले.

सविता शिंदे ही मूळची बोरगाव मधील असून सासर देखील बोरगाव आहे. दहावीत आलेल्या अपयशानंतर सविता यांच्या मावशी-काकांनी शिकण्यास प्रोत्साहन दिले. बारावीचे शिक्षण झाल्यानंतर सन २००५ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.किमान पदवीचे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पदव्युत्तरला प्रवेश घेतला, पण ते अपूर्ण राहिले.

पती रणजित यांना शिकण्याची इच्छा असूनही शिकता न आल्याने जिद्दी पत्नीला मात्र त्यांनी शिक्षणासाठी मदत केली.तिला दोन मुले आहेत. दोन मुले,‌शेतीकाम आणि संसारगाडा हे सांभाळत अभ्यास करणे मोठे आव्हान होते. परंतू, पतीच्या पाठिंब्यामुळे घरची जबाबदारी, संसार-मुले यांचा सांभाळ करत, प्रसंगी शेतीत मदत करत तिने हे यश मिळवले असून आता ‘महाजनको’मध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांची जबाबदारी सांभाळणार आहेत.

Share This Article