⁠  ⁠

12वी उमेदवारांना केंद्रीय नोकरीची संधी! सरकारच्या विविध खात्यात 1600 पदांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

SSC CHSL Bharti 2023 स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission) संयुक्त उच्च माध्यमिक स्तरासाठीची (SSC CHSL Bharti 2023) अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. 12 वी पास उमेदवारांना केंद्रीय नोकरीची ही मोठी संधी आहे. भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जून 2023 पर्यंत आहे

एकूण रिक्त जागा : 1600

रिक्त पदाचे नाव :
1) कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2) डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3) डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

शैक्षणिक पात्रता: (Qualification)
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
डेटा एंट्री ऑपरेटर – मान्यताप्राप्त मंडळाकडून गणित विषयासह विज्ञान शाखेत 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष.

जे उमेदवार त्यांच्या 12वी इयत्तेची किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत ते देखील अर्ज करू शकतात, तथापि त्यांच्याकडे कटऑफ तारखेला किंवा त्यापूर्वी 01-08-2023 रोजी आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे.

RBI मध्ये 291 जागांसाठी भरती सुरु

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 100 रुपये/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

इतका पगार मिळेल?
कनिष्ठ विभाग लिपिक : पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर: पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’’: पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये).

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 जून 2023

परीक्षा (CBT):
Tier-I: ऑगस्ट 2023
Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा

Share This Article